दरेकरवाडी परिसरात ५०० झाडे लावत महाविद्यालयातील विद्यार्थींनी वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाची घेतली जबाबदारी…

आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी
घोडेगाव –  येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित बी.डी. काळे महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास मंडळ, एन. एस. एस. विभाग व एन सी.सी. विभाग, विज्ञान विभाग आणि वन विभाग  या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच दरेकरवाडी येथे वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे उदघाट्न संस्थेचे अध्यक्ष मा.अजित काळे, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अॕड. मा. संजय आर्विकर, संस्थेचे सल्लागार आणि पंचायत समितीचे माजी सभापती मा.कैलासबुवा काळे, मा.प्राचार्य डॉ.आय.बी. जाधव, उपप्राचार्य प्रा.भागवत पवार अधिक्षक श्री.अशोक काळे, वनरक्षक मा.संतोष भूतेकर, दरेकरवाडी- काळेवाडी ग्रामपंचायतच्या उपसरपंच मा.मंगल जैद, श्री.वसंतराव दरेकर, मा.अंजली आंधळे या सर्वांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

उपवन संरक्षक अधिकारी मा.जयराम गौंडा आणि घोडेगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी मा.योगेश महाजन या दोघांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.वन विभागाने १ हेक्टर जमीन वनराई विकसीत करण्यासाठी महाविद्यालयाला वृक्षारोपणासाठी दिली आहे.

Advertise

या ठिकाणी विविध प्रजातीची ५०० झाडे लावण्यात आली आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी या ठिकाणी वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाची जबाबदारी पार पाडणार आहे. याप्रसंगी संस्थेचे संचालक व सल्लागार,सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी उपस्थित होते.संयोजन विद्यार्थी  विकास अधिकारी डॉ.गुलाबराव पारखे,कार्यक्रम अधिकारी डॉ.वल्लभ करंदीकर, एन.सी.सी.चे प्रमुख डॉ. बाळासाहेब गव्हाळे, विज्ञान शाखेचे प्रा.एन.एस.वाघ इ.नी केले होते.