कोविड-१९ अनुषंगाने महापालिका राबविणार “हॅलो पिंपरी चिंचवड.. एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व”उपक्रम- महापौर उषा उर्फ माई ढोरे

शिवप्रसाद महाले नागरिकांसोबत वेबिनारद्वारे साधणार संवाद

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी चिंचवड- दि २३ जून २०२१ सद्या देशभरासह पिंपरी चिंचवड शहरामधुन कोविड-१९ चा प्रादुर्भाव ओसरताना दिसत आहे. तथापी प्रसार माध्यमातुन भविष्यात कोविड-१९ चा प्रादुर्भाव तिस-या लाटेद्वारे राहणार, असणार आहे, असे प्रसिध्द केले जात आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सुध्दा सहा आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याचे संकेत दिलेले आहेत. त्यामुळे सद्या कोविड बाधीत असलेल्या व ज्यांना अद्याप हा आजार झाला नाही अशासह सर्वच वर्गातील नागरिकांच्या मनात भितीचे व चिंतेचे वातावरण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांमधील भीती दुर करण्यासाठी त्यांच्यामध्ये जागरुकता निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी “हॅलो पिंपरी चिंचवड.. एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व” हा उपक्रम राबवुन पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या मनात कोरोनाविषयी असलेली मानसीक समस्या दुर करण्यासाठी श्री. शिवप्रसाद महाले हे नागरिकांसोबत दररोज वेबिनारद्वारे कोरोना संबंधित गैरसमज दूर करण्यासाठी संवाद साधणार आहेत.

यापुर्वी श्री. शिवप्रसाद महाले यांनी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालय, ॲटो क्लस्टर व जम्बो रुग्णालयात “रिचार्ज टु डिस्चार्ज” उपक्रम राबविला आहे. या उपक्रमातुन ब-याच रुग्णांना दिलासा मिळल्याचे दिसून आले आहे. त्याच धर्तीवर शहरातील नागरिकांच्या मानसिक अडचणी दुर करणे, त्यांचे मनोधैर्य वाढविणे, काळजी घेण्याच्या हेतुने महापालिकेच्या माध्यमातून “हॅलो पिंपरी चिंचवड.. एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व” हा उपक्रम राबविणार असून या उपक्रमाच्या माध्यमातून लोकांच्या मनात सध्याच्या वातावरणामुळे निर्माण झालेली भिती, मानसिक ताण-तणाव दुर होण्यास मदत होणार आहे. सदर उपक्रम महापालिकेच्या वॉर रुम मधील कॉल सेंटरच्या माध्यमातुन राबविण्यात येणार आहे.

Advertise

वॉररुम मध्ये 8888006666 या हेल्प लाईनवर दररोज येणाऱ्या नागरिकांच्या फोनकॉल वरुन समस्यांविषयी माहिती घेवुन त्या माहितीचा संक्षिप्त आढावा घेऊन त्याद्वारे एक सेशन तयार करणेत येईल व त्याच दिवशी रात्री 8: 00 वाजता फोन कॉल करण्या-या नागरिकांशी वेबिनारद्वारे संवाद साधून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येईल. हा उपक्रम पिंपरी चिंचवड महापालिकेत राबविण्यात येणार असून तो एक आदर्शवत ठरुन संपूर्ण महाराष्ट्रात पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही “हॅलो पिंपरी चिंचवड.. एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व” उपक्रम राबविणारी पहिली व एकमेव महानगरपालिका ठरणार आहे. यासाठी शहरातील नागरिंकांनी आपल्या मनात कोरोना विषयी ज्या शंका असतील त्याबाबत वरील हेल्पलाईवर एक कॉल करुन आपला प्रॉब्लेम सॉल्व करावा असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *