बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे
शीरुर : दि. 23/06/3021.
मांडवगण फराटा, ता. शिरूर, जी. पुणे येथे काही दिवसापूर्वी, सोशल मीडियावर अवैध दारू विक्रि विरोधात रस्त्यावर उतरून, बाटल्या फोडून, आवाज उठवून, समाजसेवक असल्याचे भासवणाऱ्या दोघांना शिरूर पोलिसांनी जबरी चोरी व खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली असल्याची माहिती, शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापूरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यात अटक केलेल्या आरोपींच्या घरात, गावठी हातभट्टी दारू तयार करून त्याची विक्री करताना आढळून आले आहे.
शिरूर पोलिसांनी –
1) अमोल आनंदा चौगुले व
2) पप्पू आनंदा चौगुले (दोघेही रा. मांडवगण फराटा)
असे दोन आरोपींची नावे आहेत.
तर, या आरोपींचे साथीदार –
1) अजय सुर्यगंध व
2) ऋतिक परदेशी
या दोघांना रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी, जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, आरोपी अमोल चौगुले याने त्याचे साथीदारांसह, मांडवगण फराटा येथे दिनांक 24 मार्च 2021 रोजी, दारू ओतून व्हिडिओ क्लिप तयार करून ती सोशल मीडियावर व्हायरल केली होती. वास्तविक आरोपी हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून, या आरोपीने समजेवक असल्याचे भासविले होते. मात्र गावात दहशतीच्या जोरावर अनेकांना त्रास देणे सुरू ठेवले होते. आरोपी हा स्वतः घरात अवैध दारू विक्री करत होता.
अमोल उर्फ मिथुन आनंदा चौगुले व पप्पू आनंदा चौगुले (दोघे रा. मांडवगण फराटा, ता. शिरूर, जी. पुणे) या आरोपींना वेगवेगळ्या गुन्ह्यात अटक केली आहे.
मांडवगण येथील एका गृहस्थाला मारहाण करून, त्याच्या खिशातील सात हजार रुपये काढुन घेतल्याप्रकरणी, शिरूर पोलीसांकडे चौगुले विरोधात, 16 जून 2021 रोजी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच 18 जून 2021 रोजी मांडवगण फराटा परिसरातील जल्लोष हॉटेल येथे, “तुझ्या हॉटेलमध्ये दारूचे धंदे चालून द्यायचे असेल, तर आम्हाला महिन्याला दहा हजार रुपये किंवा पाच हजार रुपये द्या” अशी खंडणी मागितल्या प्रकरणी, शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता.
वरील सर्व आरोपी हे खंडणी मागणे, जबरी चोरी करणे, विनयभंग करणे, घातक हत्यारे सोबत बाळगून दमदाटी करणे, दहशत माजवणे आदी गुन्ह्यात पारंगत असून, सोशल मीडियावर खोट्या व्हिडिओ क्लिप तयार करून व्हायरल करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपी अमोल चौगुले याच्यावर आठ गुन्हे, तर पप्पू चौगुले याच्यावरही आठ गुन्हे दाखल असल्याची माहिती, पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, आरोपी अमोल चौगुले व पप्पू चौगुले, यांच्या विरोधात खंडणीची तक्रार दाखल झाल्याने, शिरूर पोलिसांनी या दोन आरोपींना विविध गुन्ह्याच्या आरोपाखाली अटक केले असल्याची माहिती, शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली आहे.