बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे
रांजणगाव : दि 23/06/2021.
रांजणगाव औद्योगिक पोलीस स्टेशन हद्दीतील, पुणे-नगर महामार्गावरील व रांजणगाव गणपती येथील लांडेवस्ती जवळ, एका वाहन चालकाला अडवून त्याला हत्यारांचा धाक दाखवत, त्याच्याकडील रोख रक्कम चोरून नेणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, सुरेशकुमार राऊत व पथकाने पकडले आहे.
सदर आरोपींकडून एक चाकू, तीन तलवारी व गुन्ह्यात वापरलेली पल्सर मोटार सायकल व जबरी चोरून नेलेले 13,500 रुपये असा ऐवज जप्त केलेला आहे.
यात पुढील चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे :-
1) रितेश वाल्मिक वाळके (वय 29 वर्षे)
2) अजय संजय सुर्यगंध (वय 25 वर्षे) दोघेही रा. मांडवगण फराटा, ता. शिरुर, जि. पुणे) व
3) ऋतिक बंडुसिंग परदेशी (वय 20 वर्षे) रा. सादलगाव, ता. शिरुर, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, सुरेश कुमार राऊत यांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की –
रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील, नगर-पुणे महामार्गावर रांजणगाव गणपती येथील लांडेवस्ती जवळुन, फिर्यादी फैसल मलिक इजाज अहमद मोमीन हे त्यांचे दोन मित्रांसह त्यांचेकडील कार क्र. MH – 01, A0 – 2909 हिच्यातून, शुक्रवार दि. १८ जून २०२१ रोजी, रात्री साडेअकरा वाजणेचे सुमारास जात असताना, त्यांना तिघा अनोळखी इसमांनी त्यांचेकडील पल्सर मोटार सायकल क्र. MH – 12, RE – 4993 हिचेवरुन येऊन, फिर्यादी यांना तुम्ही अपघात केला आहे, असा बहाणा करुन त्यांना थांबविले व फिर्यादी यांना चाकुचा धाक दाखवुन 3,500/ रु. काढुन घेतले. त्यानंतर सदर आरोपींनी फिर्यादी व त्यांचे मित्रांना आणखी दिड लाख रुपयांची मागणी करुन,
फिर्यादीस पेट्रोल पंपामध्ये नेवुन ए. टी. एम कार्डवरुन 10,000/- रु. काढून घेतले. सदरची घटना चालु
असतानाच, त्याबाबत रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना फिर्यादीचा मित्र, अमिर अहमद याने फोन करुन माहिती दिली व त्यांचे लोकेशन वॉट्स अॅपवरती पाठविले. पोलीस निरीक्षक राऊत यांनी घटनेचे गांभीर्य ओळखुन तात्काळ सदरची माहिती व लोकेशन नाईट राऊंड अधिकारी संदिप येळे यांना दिल्याने, गस्तीवरील सपोनि संदिप येळे, पो. कॉ. रघुनाथ हाळनोर, चालक पो. ना. साबळे, यांनी तात्काळ घटनास्थळी जावुन आरोपीतांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचे पैकी एक आरोपी आंधाराचा फायदा घेवुन पळुन गेला. दोन आरोपींना शिताफिने ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपीची नावे –
1) रितेश वाल्मिक वाळके (वय 29 वर्षे )
2) अजय संजय सुर्यगंध (वय 25 वर्षे), दोन्ही रा. मांडवगण फराटा, ता. शिरुर, जि. पुणे) आहेत.
सदर गुन्हयातील पळुन गेलेला आरोपी ऋतिक बंडुसिंग परदेशी याचा शोध घेत असताना, सदर आरोपी कारेगाव येथील एका खोलीमध्ये मिळुन आला असुन, त्याचे खोलीची झाडाझडती घेतली असता, त्याचे खोलीमध्ये तिन तलवारी मिळुन आलेल्या आहेत.
सदर आरोपीतांकडुन फिर्यादीचे चोरलेले 13,500/ रु. एक चाकु तसेच तिन तलवारी तसेच आरोपीतांनी गुन्हयात वापरलेली पल्सर मोटार सायकल, गुन्ह्याचे तपासात जप्त करण्यात आलेले आहे.
सदरची कामगीरी ही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव MIDC चे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप येळे, पोलीस उपनिरीक्षक सुभाष मुंढे, सहाय्यक फौजदार अनिल चव्हाण, पो. कॉ. रघुनाथ हाळनोर, पो. कॉ प्रकाश वाघमारे, पो. कॉ. उमेश कुतवळ, पो. कॉ. विजय शिंदे यांनी केली आहे.
सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुभाष मुंढे करीत आहेत.