कळस येथील शेतकऱ्यावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला,शेतकरी गंभीर जखमी..

आपला आवाज न्यूज नेटवर्क
बातमी
18/5/2021

कळस येथील शेतकऱ्यावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला,शेतकरी गंभीर जखमी,आळेफाटा येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू

विभागीय संपादक रामदास सांगळे,जुन्नर

कळस (ता.पारनेर) येथील पोपट येवले (वय-72) या शेतकऱ्यावर सायंकाळी मंगळवार (दि.१८) सहा वाजण्याच्या दरम्यान बिबट्याने हॉल करून गंभीर जखमी केले आहे.त्यांना तात्काळ दवाखान्यात दाखल केल्याने त्यांचे प्राण वाचले.
कळस येथील मेंढे मळा येथील दोन मेंढ्यांवर बिबट्याने हल्ला केला. त्यानंतर बिबट्या येवले यांच्या जनावरांच्या गोठ्यात येऊन बसला.येवले जनावरांच्या गोठ्यात गेले असता बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली.यात त्यांच्या मानेला गंभीर चीर पडली. बिबट्याने पुन्हा झडप घेऊन पायाला ,हाताला,छातीवर,गळ्याला लचके तोडून गंभीर जखमी केले.सुदैवाने येवले यांचा जीव वाचला असून त्यांच्यावर आळेफाटा येथील माऊली हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.