पिंपरी पेंढार येथील रस्त्यांची दुरावस्था ग्रामपंचायत लक्ष देईल का ?

कैलास बोडके
प्रतिनिधी

पिंपरी पेंढार – दि २१ जून
सध्या पावसाळा सुरू झाला आहे. पहिल्याच पावसात पिंपरी पेंढार गावच्या अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या धोकादायक रस्त्यावर गेल्या दोन ते तीन दिवसात काही नागरिक पाय घसरुन पडले असल्याची घटना समोर आली आहे.

परिसरातील लहान मुले जर पाय घरून पडली आणि काही हानी झाली तर याला जबाबदार कोण असेल अशी चर्चा जोर धरू लागली आहे. पिंपरी पेंढार गावातील सोशल यूथ फॉउंडेशनच्या मार्फत गावात ठीक ठिकाणी काम करतानाचे चित्र दिसत आहे.
पिंपरी पेंढार ही मोठी ग्रामपंचायत असून जर ग्रामपंचायत ला वेळ नसेल तर किमान आम्ही सोशल फाऊंडेशनशी संपर्क करून या रस्त्याची अतिशय झालेली दूर अवस्था दूर करून आमच्या आरोग्यचा प्रश्न मार्गी लाऊ असा संतप्त सवाल नागरिक करताना पाहायला मिळत आहे.


या रस्त्याच्या दुरवस्थेकडे त्या विभागातील ग्रामपंचायत सदस्यांनी त्वरित लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे अशी देखील विनंती येथील नागरीक करत आहे.

Advertise