आणे व वडगाव कांदळी येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करा – जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार

आपला आवाज न्यूज नेटवर्क
बातमी
दि.20/6/2021

आणे व वडगाव कांदळी येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करा:- जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार

बातमी:-रामदास सांगळे विभागीय संपादक,जुन्नर

साकोरी (ता.जुन्नर) येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मंजूर झाले असून जुन्नर तालुक्यातील आणे व वडगाव कांदळी येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी द्यावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके यांना पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की पुणे जिल्हा परिषदेने पुणे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र यांचा आराखडा तयार केला असून तो यापूर्वीच महाराष्ट्र शासनाकडे सादर केला आहे.

Advertise

आणे व वडगाव कांदळी या दोन्ही गावांचा या आराखड्यात समावेश आहे. नवीन इमारत बांधकामासाठी आवश्यक असणारी जमीन (जागा) देण्यास ग्रामपंचायत तयार आहे. तसेच कांदळी (वडगाव), गुंजाळवाडी (बेल्हे), रानमळा व पिंपरीकावळ या ठिकाणी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व्हावेत. या सर्व केंद्रामुळे परिसरातील लोकांना चांगली आरोग्य सेवा मिळणे सोपे होईल.