राजर्षी शाहू प्रतिष्ठान व जहाँगीर मेडिकल रिसर्च सेंटर यांच्या वतीने कुंभार आळीमध्ये लहान मुलांचे आरोग्य शिबीर संपन्न…

बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे
शिरूर : दि. 19/06/2021

शिरूर शहरातील कुंभार आळी येथे, लहान मुलांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर शुक्रवार दि. १८ जून २०२१ रोजी पार पडले. त्यात दोनशे पन्नास मुलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. राजर्षी शाहु प्रतिष्ठान, शिरूर व हिराबाई कावसजी जहांगीर मेडिकल रिसर्च सेंटर पुणे, यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर घेण्यात आले.
राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंती निमित्त, मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे, राजर्षी शाहु प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भगवान रामचंद्र श्रीमंदिलकर यांनी सांगितले.


सभागृहनेते व प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धरिवाल यांच्या माध्यमातून, शिरूर शहरात मोफत ऑक्सिजन पुरवठा करून अनेक रुग्णांचे प्राण वाचवीणारे ऑक्सीजनदूत संतोष शितोळे, तुकाराम खोले, बंटी जोगदंड, दादाभाऊ लोखंडे, सागर पांढरंकामे व याकाळात सामाजिक बांधिलकी जपत अनेक कुटुंबांना अन्नधान्याची मदत करणाऱ्या डॉ. वैशाली साखरे, आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आरोग्य सेवा देणाऱ्या डॉ संध्या गायकवाड, यांना राजर्षी शाहु कोरोना योद्धा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सध्या कोरोना महामारीने सगळीकडे परिस्थिती बिकट झाली आहे. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. संभाव्य तिसरी लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. हि लाट लहान मुलांना धोकादायक असल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर, राजर्षी शाहु प्रतिष्ठानने लहान मुलांचे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले होते. या शिबिरास प्रचंड प्रतिसाद मिळत, सुमारे दोनशे पन्नास मुलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

<