पुणे -नाशिक महामार्गांवर अपघातात एकाच कुटुंबातील ३जण जागीच ठार…मोटारसायकलला कारची पाठीमागून जोरदार धडक

प्रतिनिधी-कैलास बोडके

पुणे- नाशिक महामार्गावर भरघाव वेगाने जाणाऱ्या कारने मोटारसायकला पाठीमागून धडक दिल्यामुळे एकाच कुटुंबातील तिघाजणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी ( दि १८) सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की पिंपळवंडी (ता. जुन्नर)येथील भटकळवाडी शिवारातील राजेश निवृत्ती लेंडे हे पत्नी सुरेखा व मुलगा यश यांना घेऊन नारायणगाव येथे कपडे खरेदी करण्यासाठी गेले होते.नारायणगावाहून कपडे खरेदी करुन ते परतत असताना जांबुतफाट्याजवळ येडगाव (ता. जुन्नर )गावचे हद्दीत असलेल्या एका माॅलजवळ त्यांच्या मोटारसायकला पाठीमागून येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली त्यामध्ये राजेश निवृत्ती लेंडे ( वय ३८ वर्ष) सुरेखा राजेश लेंडे ( वय३३ वर्ष) व यश राजेश लेंडे ( वय १२ वर्ष) या तिघाजणांचा जागीच मृत्यू झाला.

हा अपघात इतका भीषण होता की, मोटारसायकलला धडक दिल्यानंतर अपघातात वॅगनार कार क्रमांक MH१४JH २२०६ ने महामार्गांवर ३ ते ४ पलट्या खाऊन कारचा व मोटारसायकलचा चक्काचूर झाला आहे.अपघातात कारचालक किरकोळ जखमी झाला आहे.या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने पिंपळवंडी गावावर शोककळा पसरली आहे.या अपघाताचा पुढील तपास नारायणगाव पोलिस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *