शिरुर शहर मनसेकडून PFI च्या देशद्रोही वक्तव्याचा निषेध करत आंदोलन

रवींद्र खुडे
विभागीय संपादक
२८ सप्टेंबर २०२२

शिरूर


पुणे दहशदवादी हालचालींचे ठिकाण होत आहे का ? तसेच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोर राहतात हे मनसे सातत्याने सांगत आहे. अशीच घटना काल पुणे येथे घडली असुन काही समाज कंटकांकडुन ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशा घोषणा देण्यात आल्या. याच्या निषेधार्थ दि. २५ सप्टेंबर २०२२ रोजी शिरुर शहर मनसेच्या वतीने शिरूर एस टी स्टँड परिसरात निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी मनसे शहराध्यक्ष अविनाश घोगरे, मनसे महिला आघाडीच्या डाॅ. वैशाली साखरे, महिला शहराध्यक्षा शारदा भुजबळ, प्रसन्ना भोसले, विलास वीर, शैलेश जाधव, तसेच भाजपाचे उमेश शेळके, अजिंक्य तारु, रविराज बैनाडे, राकेश परदेशी, अमर झेंडे, नितीन काळे, राहुल भोते, योगेश कदम, रोहन जासुद तसेच अनेक नागरिक उपस्थित होते.

यावेळी बोलताना शहराध्यक्ष अविनाश घोगरे म्हणाले की, पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोर देशातून हकलून द्या, यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सातत्याने बोलत आहेत. तशी आंदोलनेही सातत्याने मनसे कडून केली गेली आहेत. तसेच पुणे, पिंपरी चिंचवड शहरात अनेक ठिकाणी हे लोक आश्रयाला असल्याचे मनसेकडून सांगूनही अशा लोकांवर कारवाई होत नाही. परंतु पुण्यातील घटनेने आतातरी सावध होऊन, अशा देशद्रोही घोषणा देणाऱ्या समाज कंटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल.

तसेच “जीथे देशभक्ती आणि देशप्रेमाचा विषय उपस्थित होतो, अशावेळी आपल्या देशातील सर्व जाती, धर्म, पंथ यांनी एकञ येऊन आपल्या देशाच्या विरोधात काम करणाऱ्या संघटना मोडीत काढल्या पाहिजेत.” अशी भावना मनसेच्या महिला आघाडीच्या शारदा भुजबळ आणि डाॅ. वैशाली साखरे यांनी व्यक्त केली. शिरूर शहर मनसेच्या वतीने यावेळी हिंदुस्तान मुर्दाबाद म्हणणाऱ्या पीएफआय च्या आंदोलन कर्त्यांचा, त्यांनी दिलेल्या देशद्रोही घोषणांचा खरपूस समाचार घेत, त्यांचा निषेध करत पाकिस्तान मुर्दाबाद च्या घोषणा देण्यात आल्या.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *