आपला आवाज आपली सखी आयकार्ड 2021 व सभासद गीफ्ट उद्घाटन दिमाखात संपन्न…

छत्रपती संभाजी महाराज मालीका फेम प्राजक्ता गायकवाड आपला आवाज कला गौरव पुरस्कार 2020 ने सन्मानित

पिंपरी-चिंचवड प्रतिनीधी, दि.28/11/2020

आपला आवाज आपली सखी सभासद आयकार्ड सभासद गीफ्ट चे उद्घाटन महापौर उषा उर्फ माई ढोरे व स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मालिका फेम प्राजक्ता गायकवाड यांच्या हास्ते संपन्न झाले.

यावेळी आपला आवाज न्यूज नेटवर्क चे मुख्य संपादक अतुल परदेशी आपला आवाज आपली सखी च्या संचालिका संगीता तरडे विभागीय संपादक रोहीत खर्गे सुनीती ज्वेलर्सचे संचालक लखीचंद कटारिया, स्वर्णिम ज्वेलर्सच्या संचालिका अक्षता मोहिते कलामंदिर ट्रॉफीच्या संचालिका शिल्पा शिंदे उप पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मालिका फेम प्राजक्ता गायकवाड यांना महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते आपला आवाज कलागौरव पुरस्कार 2020 ने स्नमानित करण्यात आले…

आपला आवाज आपली सखी आयकार्ड उदघाटन सोहळ्याला अनेक सखींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आपला आवाज आपली सखीच्या नवीन सभासद आयकार्ड आणि गिफ्टचे अनावरण करण्यात आले.

प्रमुख पाहुण्यांनी आपला आवाज आपली सखीच्या पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. नारीशक्ती पुरस्कार २०१९ प्राप्त महिलांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *