शिवनेरी जम्बो कोविड हाँस्पिटल लोकार्पण समारंभ..गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

24 कोटी रूपये खर्चून उभारलेल्या कोवीड सेंटर ला 12 कोटी रूपयांची लोकवर्गणी

मंचर
दि.13/06/2021
अतुलसिंह परदेशी
मुख्य संपादक

कोवीड 19 च्या पहिल्या आणि दुस-या लाटेने जगभरात थैमान घातले असताना अनेकांना वेळेवर उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागला याची जाणीव ठेवून येणा-या तिस-या लाटेची वाट न पाहता आंबेगांव तालुक्यातील आवसरी याठिकाणी शिवनेरी जम्बो कोविड हाँस्पिटल चे राज्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करून लोकार्पण सोहळा संपन्न झाला…
अवघ्या 29 दिवसात तब्बल 24 कोटी रूपये खर्च करून उभारण्यात आलेल्या शिवनेरी जम्बो कोवीड हाँस्पिटल ला 12 कोटी रूपयांचा लोकार्पण निधी उपलब्ध झाला…

Advertise


या कोविड सेंटर मध्ये 244 ऑक्सिजन बेड 48 व्हेंटिलेटर बेड तसेच सर्व सुविधां या हाँस्पिटल मध्ये उपलब्ध करण्यात आल्या आहेत…
जुन्नर आंबेगांव खेड शिरूर या परिसरातील रूग्णांना या अद्ययावत कोविड सेंटर चा फायदा होणार आहे…आज 13 जुन रोजी या कोवीड सेंटर चे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा संपन्न झाला यावेळी खेड विधानसभेचे आमदार दिलीपराव मोहिते पाटील शिरूर विधानसभेचे आमदार अशोक पवार जुन्नर विधानसभेचे आमदार अतुल बेनके जिल्हाधिकारी राजेश देशमुख पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख पराग उद्योग संचालक उद्योजक देवेंद्रशेठ शहा माजी आमदार पोपटराव गावडे माजी आमदार सूर्यकांत पलांडे आदी मान्यवर उपस्थित होते…

चौकट
गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील

आपल्या लोकसंख्येला पुरक अशी आरोग्य व्यवस्था नाही
कोरोना देशभरातून हद्दपार करण्यासाठी 100% लसीकरण होणे गरजेचे आहे
तिसा-या लाटेचीवाट पहात न बसता ज्याला आधार नाही त्याला आधार आणि विनामूल्य कोवीड चे उपचार मिळावे यासाठी हे शिवनेरी जम्बो कोविड हाँस्पिटल उभे केले आहे
देवेंद्रशेठ शहा आणि सहका-यांनी आवघ्या 29 दिवसात रात्रंदिवस एक करून हे कोविड हाँस्पिटल उभे केले आहे त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो

आमदार दिलीपराव मोहीते
पहिल्या दुस-या लाटेत बेसावध राहिल्याने आपल्याला आपल्यातील अनेकांना गमवावे लागले
गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी तिस-या लाटेची वाट न पाहता आंबेगांव मध्ये अद्यावत असे शिवनेरी कोविड सेंटर उभारले त्या बद्दल त्यांचे आभार

आमदार अशोक बापु पवार
शिवनेरी कोविड सेंटर मध्ये रूग्णाना चांगले उपचार मिळतील यात काही शंका नाही
शहरी भागातील रूग्णालयाला लाजवेल असे आंबेगांव मधील शिवनेरी कोविड हाँस्पिटल आहे

आमदार अ