मंचरला भाजपा तर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकात चक्का जाम आंदोलन…

मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतीय जनता पार्टीच्या वतीने ओबीसींच्या राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज चक्का जाम आंदोलन करण्यात आले. संपूर्ण राज्यभरात पुकारण्यात येत असलेल्या चक्का जाम आंदोलनानुसार भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख जयसिंग एरंडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

कोरोनाच्या नियमांचे पालन करून तसेच ठराविक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले यावेळी राज्य सरकार ओबीसी तसेच मराठा आरक्षणासंदर्भात जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला तसेच राज्य सरकारने न्यायालयात ओबीसींची भूमिका योग्य प्रकारे न मांडल्यामुळे आरक्षण रद्द झाले असल्याचे सांगून भारतीय जनता पार्टी ओबीसी समाजाच्या पाठीशी उभी असून ओबीसींना न्याय मिळवून देण्यास प्रयत्नशील असल्याचे सांगितले तसेच राज्य सरकारने सदर विषयात सहकार्य न केल्यास प्रत्येक गावागावात आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी याप्रसंगी दिला. यावेळी आंबेगाव भाजपा अध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे, मंचर भाजपा शहराध्यक्ष नवनाथ थोरात यांनी आपले मनोगत वक्त केले.

Advertise

याप्रसंगी किसान मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष संजय थोरात,ओबीसी आघाडी प्रमुख सुरेश अभंग, तालुका संघटक संदीप बाणखेले, रोहन खानदेशे, सोमनाथ फल्ले, संजय अभंग, पंकज भालेराव, संतोष पारधी, रवी भालेराव आदी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते. सदर आंदोलनाच्या ठिकाणी मंचर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *