बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे
शिरूर : दि. 04/06/2021.
सध्या कोव्हीड 19 या संसर्गजन्य रोगामुळे अवघे जग मेटाकुटीला आले आहे. भारतातही या रोगाने खूप हा हा कार माजविलेला आहे. त्यामुळे सर्व कामे व व्यवसाय बंद असून, या रोगावर नियंत्रण मिळविणे एवढाच उद्देश सर्वांचा आहे. त्यासाठी शासन, प्रशासन, सर्वच राजकीय पक्ष, संस्था व दानशूर लोक प्रयत्नशील आहेत.
याच पार्श्वभूमीवर, पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी व पुणे जिल्हा काँग्रेस सेवादलही, कोव्हिड योध्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी आमदार संजयकाका जगताप व आमदार संग्रामदादा थोपटे यांच्या नेतृत्वाखाली, जिल्ह्यातील पत्रकार त्याचप्रमाणे शासन व प्रशासनातील कार्यरत, अशा कोव्हिड योध्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यासाठी काँग्रेसचे राज्याचे ओबीसी नेते राजू इनामदार, पुणे जिल्हा खजिनदार महेशबापू ढमढेरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
शिरूर तालुक्यातील कोव्हिड योध्यांना पुरस्कार वितरण करतेवेळी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैभव यादव यांच्या नेतृत्वाखाली, शिरूर तालुका ओबीसी अध्यक्ष सचिन नर्के, शिरूर शहराध्यक्ष ऍड किरण आंबेकर, शहर युवकाध्यक्ष अमजद पठाण, शिरूर महिला काँग्रेस सरचिटणीस प्रियांका बंडगर आदी काँग्रेस व काँग्रेस सेवादलाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यासाठी पुणे जिल्हा काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष, अशोक चंद्रकांत भुजबळ यांचे विशेष योगदान होते.
शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या सन्मानचिन्ह प्रदान सोहळ्यावेळी, आपला आवाज न्यूज नेटवर्क व केबल टी. व्ही. वाहिनी व पोर्टल न्यूज चे विभागीय संपादक प्रा. रवींद्र पंढरीनाथ खुडे, यांची पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र, च्या पुणे जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल, काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार करत, कोव्हिड योद्धा म्हणून सन्मानचिन्ह देऊन, गौरव करण्यात आला.
तर शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने या निवडीबद्दल रवींद्र खुडे यांना शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमावेळी, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर जिजाबा जांभळकर, उपसभापती विकास काशिनाथ शिवले, माजी सभापती विश्वास ढमढेरे, संचालक प्रविण चोरडिया, बंडू जाधव, विजेंद्र गद्रे, सतीश कोळपे, प्र. सचिव अनिल ढोकले व बाजार समितीचे कर्मचारी व व्यापारी उपस्थित होते.
यावेळी, काँग्रेस कमिटीच्या वतीने, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर जांभळकर यांनाही, या कोव्हिडच्या काळात बाजार समितीचे कामकाज उत्तम पद्धतीने चालविल्याबद्दल, कोव्हिड योद्धा म्हणून गौरविण्यात आले.
बाजार समितीचे प्र. सचिव अनिल ढोकले, यांनी यावेळी सर्वांचे आभार व्यक्त केले.