बातमी प्रतिनिधी : विकास भालचिम,जुन्नर
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या जुन्नर शाखेच्या वतीने नायब तहसीलदार सचिन मुंढे साहेब यांना निवेदन देऊन निषेध नोंदविन्यात आला.
मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना जिल्हाधिकारी ,प्रांताधिकारी ,तहसीलदार , पोलिस प्रशासन यांच्या मार्फत विविध शैक्षणिक प्रश्नाबद्दल व काल धुळे येथे अभाविप च्या कार्यकर्त्यांना अमानुषपणे झालेली मारहाणीचा जाहिर निषेध या संदर्भात निवेदन देण्यात आले तीस टक्के शुल्क माफी मिळावी यासह इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी बुधवारी धुळ्याचे पालकमंत्री अब्दूल सत्तार यांचा ताफा अडविला होता.
विद्यार्थ्यांना पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज केला. यात काही विद्यार्थी जखमी झाले यात राज्यमंत्री अब्दुल सत्तार व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राजीनामा द्यावा. अशी मागणी अभाविप कडून करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्या तत्काळ सोडवाव्यात, अन्यथा अभाविप संपूर्ण महाराष्ट्र भर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशाराचा सुद्धा निवेदनात करण्यात आला.
या वेळी अभाविप उत्तर पुणे जिल्हा संयोजक आणि महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य आकाश गाडे. महाविद्यालयीन प्रमुख प्रथमेश कालेकर. आदित्य कालेकर. विनायक शेट्टे. गौरव सोनवणे. ओम होगे. यावेळी उपस्थित होते.