भोर तालुक्यातील केळवडे येथील फार्म हाऊस वरील डान्स बारबाला व तरुणांवर राजगड पोलिसांचा छापा…

बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे.
भोर : दि. 30/05/2021

भोर तालुक्यातील पुणे-सातारा हायवे वरील, केळवडे गावच्या परिसरातील एका फार्म हाऊसवर, पुणे ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून, धनगड धिंगा करत असणाऱ्या १३ तरुण-तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पैशाची उधळण करत हा डान्सबार रंगला होता. पण ऐन रंगात आलेल्या या मैफिलीवर, राजगड पोलिसांनी छापामारी करत, येथून सहा मुलींची सुटका केली.

पुणे -सातारा महामार्गावरील भोर तालुक्यातल्या केळवडे गावाच्या हद्दीत असणाऱ्या, सुमित प्रकाश साप्ते (सध्या राहणार गाऊडदरा, ता. हवेली) या व्याक्तीच्या फार्महाऊसवर दिवसाढवळ्या डान्सबार चालू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे, या डान्सबारवर पोलिसांनी धाड टाकत कारवाई करत, बारगर्ल यांच्यासह तेथे उपस्थित आरोपींना ताब्यात घेतले आहे.
यातील धक्कादायक बाब म्हणजे, मुंबई व ठाण्यातल्या मुलींना, अशाप्रकारे खासगी फार्महाऊसवर आणून येथे धांगडधिंगाणा सुरु होता. या प्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे-सातारा महामार्गावरील सुमित प्रकाश साप्ते (रा. गाऊडदरा, ता. हवेली) यांचे गट नं. 623, प्लॉट नं. 35 मधील, दुमजली फार्महाऊसवर रंगीबेरंगी लाईट आणि डीजेच्या आवाजात तरुण-तरुणीचा डान्स सुरू आहे, अशी माहिती 29 मे 2021 रोजी दुपारी 02.15 वा. पोलीस नियंत्रण कक्ष, पुणे यांना मिळाली होती. याची माहिती राजगड पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर लगेचच पोलिसांनी या फार्म हाऊसवर छापा टाकत, येथे उपस्थित तरुण व तरुणी अशा एकूण तेरा जणांना ताब्यात घेतले आहे.
या सर्वांनी कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे व उपाययोजनांचा भंग केल्याने, त्यांच्यावर राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या छाप्यात

1) सागर रमेश जाधव (वय 32, रा. खडकवासला कॅनॉल शेजारी, हवेली), 2) सुनील निवृत्ती पाठक (वय 33, रा. दत्तनगर, गणेश मंदिराशेजारी धनकवडी, पुणे),
3) विकी वसंत शेलार (वय 22, रा. केळवडे, ता. भोर),
4) गणेश विजय कदम (वय 33, रा. पद्मावती मंदिराशेजारी पद्मावती, पुणे),
5) अविनाश संजय साखरकर (वय 24, रा. विश्रांतवाडी, घोलप वस्ती, गणेश मंदिराजवळ, पुणे),
6) विशाल गणेश पासलकर (वय 38, रा. निलगिरी कंपाऊंड आंबेगाव पठार, पुणे),
7) सचिन लक्ष्‍मण शिंदे (वय 37, रा. धनकवडी पोलिस चौकी शेजारी,