शिरूर लोकसभेसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून १२ रस्त्यांची कामे हाती घेणार
जिल्हा वार्षिक आरख्याड्यातून आंबेगाव तालुक्यातील गंगापुर खुर्द येवलेवस्ती ते सावंतवस्ती येथे जाण्यासाठी बांधण्यात आलेल्या साकव पुलाचे उद्घाटन आज संपन्न झाले.
तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील सावंतवस्ती येथे ६०-७० कुटुंबांना दैनंदिन वापरासाठी लांब अंतरावर असलेल्या गंगापुर खर्द येथील पुलावरून जावे लागत होते. गंगापुर खुर्द येवलेवस्ती ते सावंतवस्ती जाण्यासाठी एक साकव पुल व्हावा अशी मागणी ग्रामस्थांनी माझ्याकडे केली. त्या अनुषंगाने जिल्हा नियोजन समिती पुणे आदिवासी योजनेअंतर्गत यासाठी २५.२७ लक्ष रूपयांचा साकव पुल मंजूर करण्यात आला. या पुलाचे काम पूर्ण होऊन त्याचे उद्घाटन आज दि. २९ मे रोजी करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा परीषद सदस्य व गटनेते देविदास दरेकर, सहसंपर्कप्रमुख सुरेशभाऊ भोर, उपजिल्हा प्रमुख सुनिल बाणखेले, तालुका प्रमुख अरूण गिरे, ह. भ. प. पांडुरंग महाराज येवले, शिवसेना तालुका समन्वयक राजाभाऊ काळे, संघटक महेश ढमढेरे, भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक सागर काजळे, उपतालुकप्रमुख विश्वास लोहोट, सरपंच रोहिणी मधे, निखिल येवले, नित्यानंद येवले, संतोष सावंत, राजेंद्र गाडेकर, प्रविण कोकणे, राजेंद्र कोकणे आदि मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
गंगापुर खुर्द, बुद्रुक व इतर वाडयावस्त्यांवर जाणाऱ्या घोडनदीवरील पुलाचे कामासाठी प्रयत्न करत असुन तो लवकरच पुर्ण होणार आहे. तसेच २५१५ ग्रामविकास निधीतुन आंबेगाव तालुक्यातील लहान मोठया कामांसाठी साडे तीन कोटी रूपयांची कामे व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन मुख्यमंत्री मा.उध्दवजी ठाकरे यांच्या माध्यमातुन शिरूर लोकसभा मतदार संघासाठी १२ प्रमुख रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळविण्यात यश आले असल्याचे शिवसेना उपनेते, संपर्कप्रमुख, शिरूर लोकसभेचे मा.खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले.