ऋषभ पंत सेमीफायनल खेळणार का नाही? कोच द्रविड म्हणतात

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०८ नोव्हेंबर २०२२


झिम्बाब्वेविरुद्धच्या शेवटच्या सुपर-12 फेरीच्या सामन्यात भारतीय संघ व्यवस्थापनाने ऋषभ पंतचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला होता. त्यासाठी दिनेश कार्तिकला बाहेर बसावे लागले होते. पण योग्यवेळी फलंदाजीची संधी मिळूनही ऋषभ पंत अगदी स्वस्तात 3 धावा करुन तंबूत परतला. त्यामुळे आता इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या अर्थात सेमीफायनलच्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघ व्यवस्थापन पंतवर विश्वास ठेवून त्याला संघात घेणार का असा प्रश्न सर्वांसमोर आहे. त्यातच कोच राहुल द्रविडच्या एका वक्तव्यानं पंत कदाचित संघात असू शकतो असं म्हटलं जात आहे.

राहुल द्रविड पंतच्या कामगिरीबद्दल बोलताना म्हणाला, केवळ एका सामन्याच्या आधारे खेळाडूचा खेळ ठरवणं योग्य नाही, पंतवरील संघ व्यवस्थापनाचा विश्वास कधीच कमी झाला नाही. आमच्यासोबत 15 खेळाडू आहेत, सगळेच आत्मविश्वासाने भरलेले आहेत, पण केवळ 11 खेळाडूंनाच प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. त्यात कोणत्या खेळाडूला संधी द्यायची, हे टीम मॅनेजमेंट आणि रणनीतीवर अवलंबून आहे. पुढे बोलताना द्रविड म्हणाला की, ऋषभ पंत नेटमध्ये चांगली फलंदाजी करत आहे. त्याचा टायमिंग चांगला आहे. याशिवाय तो विकेटकीपिंग आणि क्षेत्ररक्षणाचा सरावही करत आहे.’ या सर्व वक्तव्यामुळेच कदाचित पंतला संघात संधी मिळण्याची शक्यता आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *