आशाताईं बुचके यांची उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे जुन्नर तालुक्यासाठी जम्बो कोविड सेंटरची मागणी..

पुणे(प्रतिनिधी)
दि.21/05/2021

आशाताई बुचके यांनी अजित दादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे जंबो कोविड सेंटर मागणी केली…
जुन्नर,आंबेगाव, खेड व शिरूर या चार तालुक्यांसाठी अवसरी (मंचर) येथे सुमारे रक्कम 24 कोटी रुपये खर्च करून जम्बो कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे,परंतु जुन्नर तालुक्याचा भौगोलिक विचार करता नागरिकांना गैरसोयीचे होणार आहे. सुमारे 60 ते 70 किलोमीटर चे अंतर असणारे जम्बो कोविड सेंटरचे अंतर असणार आहे, त्यामुळे जुन्नर तालुक्यातील घाटघर(नाणेघाट), दार्याघाट, हातविज, हिवरे पठार, कोपरे मांडवे, मढ, तळेरान, आणे, नळावणे या सारख्या पठार व दुर्गम आदिवासी भागातून रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना अवसरी (मंचर) मधील जम्बो कोविड सेंटरला येऊन उपचार घेणे फार त्रासदायक व गैरसोयीचे होणार आहे. त्याऐवजी आम्हाला जुन्नर येथे जम्बो कोविड सेंटर मिळावे व जुन्नर तालुक्यासाठी स्वतंत्र चार ते पाच कोटी रुपये मदत मिळावी त्यामध्ये 15 ते 25 व्हेंटिलेटर व 100 ऑक्सिजन बेड असावे अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके यांनी केली…

शिरोली बुद्रुक, नारायणगाव, लेण्याद्री, ओझर या ठिकाणी जंबो कोविड सेंटरसाठी सर्व पायाभूत सुविधा सोई उपलब्ध आहेत,त्यामुळे मंचर अवसरी येथील 24 कोटी रुपयांचा खर्च आपण करतच आहात त्यासोबतच चार ते पाच कोटी रुपये जुन्नर तालुक्यासाठी स्वतंत्र जम्बो कोविड सेंटर साठी उपलब्ध करून दिल्यास तालुक्यातील जनता आणि रुग्णांची सोय होऊ शकेल या मागणीचा विचार करून जुन्नर तालुक्याला स्वतंत्र जम्बो कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घ्यावा अशा प्रकारच्या मागणी सौ.आशाताई बुचके यांनी उपमुख्यमंत्री श्री.अजित दादा पवार (पालकमंत्री पुणे जिल्हा) यांच्याकडे केली…