पिंपरी-चिंचवड कल्चरल फाउंडेशनच्या वतीने राधा मंगेशकर यांची मुलाखत

पिंपरी प्रतिनिधी
१४ सप्टेंबर २०२२


गानसम्राज्ञी लता दीदी सर्वांच्याच गायन क्षेत्रातील  प्रेरणास्थान होत्या. परंतु त्यांच्याकडून  विशेष काही गायनाचे धडे घेतले नाही. दिदिंचा सहवास लाभला पण गुरू म्हणून नाही मिळाला. जे काही गायन करते ते फक्त माझे वडील हृदयनाथ मंगेशकर यांच्याकडूनच शिकले आहे. असे प्रतिपादन प्रख्यात गायिका डॉ.राधा मंगेशकर यांनी केले. पिंपरी चिंचवड कल्चरल फौंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या मुलाखतीच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पिं चिं कल्चरल फौंडेशनचे अध्यक्ष विजय भिसे यांनी डॉ राधा मंगेशकर यांची मुलाखत घेतली. 

वपुर्झा आर्ट एंड कल्चर म्यूजियम कुडजे ,मुळशी येथे निसर्गाच्या सानिध्यात पार पडली. या प्रसंगी लंडन ,स्विस ,पॅरिस एक अविस्मरणीय अनुभव  ह्या अनिता भिसे लिखित पुस्तकाचे प्रकाशनही राधा मंगेशकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी ह.भ.प पुरुषोत्तम महाराज पाटील, माजी नगरसेवक शतृघ्न काटे, कुंदा भिसे, प्रेरणा बॅंकेच्या चंदा भिसे, माजी आमदार विलास लांडे आदी उपस्थित होते.

 


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *