सामाजिक उपक्रम म्हणून नारायणगावच्या भटकंती ट्रेकर्सला मोहटादेवी व्यापारी मंडळाकडूनअन्न धान्याची मदत

मंगेश शेळके(ओझर प्रतिनिधी)

दि. १६ मे २०२१
( ओझर ) : मोहटादेवी व्यापारी मित्रमंडळ कारखाना फाटा धनगरवाडी ने आज भटकंती Trekers group नारायणगांव जो संपूर्ण कोविड सेंटर मधील करोना रूग्णांला व कोरोंटाईन व्यक्ती ना मोफत अन्नदान करतोय तेही अगदी घरगुती पध्दतीने बनलेले रूचकर,स्वादिष्ट ,त्यांच्या ह्या कार्यास खरच तोड नाही,


त्या group ला आपल्या मंडळाकडून गहू व तांदूळ देण्यात आला ,फुल ना फुलाची पाकळी ह्या हेतूने केलेली ही मदत तर नगण्य आहे,पण समाजाचे आपण काही देणे लागतो या हेतूने प्रत्येकाने खारीचा वाटा उचलला व त्यांच्या कार्याला मदत करावी खरच खूप कौतुक करावे तेवढे थोडेच आहे,त्यांचे अनुभव ऐकून खरच अंगावर शहारे आले,
ह्या कामी मंडळाचे सर्व व्यापारी सदस्य व श्री राजेंद्र खिलारी, गोंविद गावडे,प्रविण शिंगोटे, शशिकांत वाळुंज, महेश मोढवे,संकेत घूले,मच्छिंद्र शेळके, मारूती भोर, विकासनाना भोर व सूरज भाऊ वाजगे यांचे सहकार्य लाभले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *