चावंड किल्ल्यावरून मेटल डिटेक्टर सह एकाला वनविभागाने केली अटक…

जुन्नर,16 मे

निवासी संपादक पवन गाडेकर, जुन्नर

विक्रम शांताराम हाडवळे डुंबरवाडी ता जुन्नर जि पुणे वय वर्ष ३६ चावंड किल्ल्यावर संशयित वाटल्याने त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन चावंड चे पोलीस पाटील स्वरूप शेळकंदे यांनी वनविभागाला दिली माहिती देताच तात्काळ वनपाल शशिकांत मडके वनरक्षक वैभव वाजे सचिन कवटे घटनास्थळी दाखल झाले हाडवळे यांच्याकडे मेटल डिटेक्टर कुदळ गज चमचा ताटली पेन्सिल सेल रोप इ साहित्य आढळून आले वनविभागाने त्याच्याकडून काही धातूचे तुकडे जुनी नाणी या वस्तू ताब्यात घेतल्या आहेत.


या अगोदर देखील दिनांक २२फेब्रुवारी रोजी याच व्यक्तीला वणवा लावण्याच्या संशयावरून वनविभागाने ताब्यात घेतले होते आणि तसा लेखी जबाब ही त्याच्याकडून घेतला होता.
त्याच्यावर अवैध उत्खनन,खोदकाम करणे वणवा लावणे वनक्षेत्रात अपप्रवेश करणे
भारतीय वनअधिनियम १९२७  चे कलम २६/१ ABDGH नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे
तसेच
जुन्नर पोलीस स्टेशन आणि पुरातत्व विभाग यांना देखील याबाबत ची माहिती कळवली असल्याचे
वनपरीक्षेत्र अधिकारी अजित शिंदे
यांनी सांगितले
सदरची कारवाई एस पी कडू उपवनसंरक्षक जुन्नर व अमित भिसे सहाय्यक उपवनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली