रोहित खर्गे
विभागीय संपादक
आकुर्डी- दि १५ मे २०२१
काल दि १५ मे रोजी माजी नगरसेविका चारुशीला प्रभाकर कुटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या मागे त्यांना दोन मुले,दोन मुली,सुना ३ नातवंडे असा परिवार आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांचे पती ह.भ.प.प्रभाकर मल्हारी कुटे यांचे निधन झाले. चारुशीला कुटे यांचा जन्म १९६७ साली पिंपळे गुरव येथे झाला. त्यांचे वडील ज्ञानोबा कदम हे पिंपळे गुरव गावचे सरपंच होते. लहानपणापासूनच समाज कार्याचा वारसा त्यांना लाभला होता. त्यांचे पती प्रभाकर कुटे यांचाही आकुर्डी गावच्या सामाजिक कार्यात सहभाग होता.२०१२ साली पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रभाग १५ मधुन चारुशीला कुटे यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढविली व मोठया फरकाने विजयी झाल्या. या कालावधीत त्यांनी संत तुकाराम महाराज पालखी कमान, दत्तवाडी आकुर्डी रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण, गरीब व गरजु विद्यार्थ्यांची स्वखर्चातुन फी माफी, १०० बेडचे आकुर्डी महापालिका रुग्णालय, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान यासारखी उल्लेखनीय कामे त्यांच्या माध्यमातून झाली.पुढे २०१७ साली त्यांचे चिरंजीव नगरसेवक प्रमोद कुटे यांनी महापालिकेची निवडणूक लढविली व मोठया फरकाने विजयी झाले श्रीमती चारुशीला कुटे यांचा सामाजिक वारसा त्यांची मुले पुढे यशस्वीपणे चालवत आहे. चारुशीला ताई यांना तमाम शिवसैनिक व आपला आवाजकडून भावपुर्ण श्रद्धांजली .