रोहित खर्गे
विभागीय संपादक
पिंपरी- दि १३ मे २०२१
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ऑटोक्लस्टर येथील कोविड सेंटर मध्ये रुग्णांना बेड मिळवण्यासाठी पैसे घेतले जातात हे उघड झाले व संबंधितांना अटकही झाली. व याचे पडसाद शहरभर उमटलेच पण महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजप चे नगरसेवक कुंदन गायकवाड, विकास डोळस, नगरसेविका सीमा सावळे यांच्यासह सेनेच्या राहुल कलाटे , सचिन भोसले, राष्ट्रवादी चे माजी महापौर योगेश बहल या व अनेक विरोधकांनी वाभाडे काढले. हे प्रकरण खूपच गाजले सर्वसाधरण सभेत महापौर माई ढोरे यांनी १० दिवसाच्या मुदतीत स्पर्श वर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांना दिले.
आयुक्तांनी या प्रकरणी लक्ष घालून झालेल्या सर्व प्रकरणाची शहनिशा करून पालिकेचे प्रशासन नेमून स्पर्श ची हकालपट्टी केली.
पण आता स्पर्श ऑटोक्लस्टर या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले असून स्पर्श चे अमोल होळकुंदे यांनी पोलसांत सुहास भाकरे या एका बड्या पत्रकाराच्या नावे तक्रार दाखल केली असून या पत्रकाराने आमच्याकडे 5 लाखाची खंडणी मागितल्याची तक्रार पोलिसांत दिलीय. त्यातील २ लाख रोख व ३ लाख त्याच्या खात्यात वर्ग केल्याचे सांगितले. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले असून शहरात व पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता पोलीस काय भूमिका घेतात याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.