![](https://i0.wp.com/aaplaawajnews.com/wp-content/uploads/2021/05/IMG-20210511-WA0000.jpg?resize=213%2C237&ssl=1)
आंबेगाव –
आंबेगाव ब्युरोचिफ, मोसीन काठेवाडी
कोविड महामारीच्या परिस्थितीत आरोग्य यंत्रणा बळकट व्हावी यासाठी आंबेगाव विधानसभेचे आमदार व राज्याचे गृह मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या आमदार निधीतून ८४.५८ लक्ष रूपये मंचर उपजिल्हा रूग्णालय व विधानसभा क्षेत्रातील इतर ग्रामीण रूग्णालयांमध्ये यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीसाठी दिले आहेत.
कोविड मध्ये आंबेगाव, शिरूर, जुन्नर तालुक्यातील लोकांनी व्यवस्था व्हावी यासाठी मंचर उपजिल्हा रूग्णालयात आॅक्सिजन व व्हेंटिलेटर वर असणा-या रूग्णांची व्यवस्था करण्यात आली तसेच अवसरी येथील शासकिय अभियांत्रीकी महाविद्यालयाच्या वसतीगृहांमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. या दोन ठिकाणांमूळे लोकांची मोठी सोय झाली व पुणे, पिंपरी चिंचवड शहरांकडे उपचारासाठी जाण-या लोकांची जवळच सोय झाली.
दिवसेंदिवस कोविडची परिस्थिती बिकट होत आहे, यामध्ये लोकांना व्हेंटिलेटर, आॅक्सिजन, काहि यंत्रसामुग्री व औषधे पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत. वेळोवेळी होणा-या बैठकांमधून डॉक्टर व अधिका-यांकडून समज असलेल्या अडचणीं लक्षात घेवून आमदार निधीतून काहि यंत्रसामुग्री व औषधे घेण्याचा निर्णय वळसे पाटील यांनी घेतला व त्यानुसार ८४.५८ लक्ष रूपये आमदार निधी आरोग्य यंत्रणेकडे वळवला.
या रकमेतून व्हेंटिलेटर, आॅक्सिजन कॉन्सट्ेटर, बीपाप मशिन, मल्टीप्रा मॉनिटर, बबल सी पॅप, इमरजेन्सी टॅली, क्रास कार्ड इत्यादी साहित्य व औषधे खरेदी केली जाणार आहेत. जिल्हाधिकारी यांनी ८४.५८ लक्ष रूपयांना प्रशासकिय मान्यता दिली असून लवकरच या निधीतून हि सामुग्री आंबेगाव विधानसभा मतदार संघात येणार आहे.