
पिंपरी-चिंचवड
रोहीत खर्गे
शूरवीर महाराणा प्रताप यांची ४८१ वावी जयंती पिंपरी-चिंचवड येथील राजपुत समाज संघटनेचे अध्यक्ष शिवकुमारसिंह बायस व राजपुत बांधवानी मोठ्या उत्साहात साजरी करत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते…

यावेळी पिंपरी-चिंचवड शहर भाजपा अध्यक्ष आमदार महेश लांडगे,माजी महापौर राहुलदादा जाधव,सत्तारूढ पक्षनेता नामदेव ढाके,मनसे शहराध्यक्ष तथा गटनेता सचिन चिखले,नगरसेवक उत्तम केंदळे,नगरसेवक कुंदन गायकवाड, नगरसेवक बाप्पू घोलप,माजी नगरसेविका अश्विनी ताई चिखले,सा.का.पांडाभाऊ साने व अनेक मान्यवर उपस्थीत होते.

पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील राजपुत बांधव राणा अशोकसिंह इंगळे, महेंद्र गिरासे,गणेशसिंह राजपूत यांच्या पुढाकाराने आणी रवी भाऊ सुरडकर, मनोज मराठे, मुकेश राजपूत,जयदीप सिसोदिया,रूपेश राजपूत, दिनेश राजपूत, शशिकांत गिरासे श्रीराम परदेशी राजकुमार परदेशी यांच्या अथक प्रयत्नाने आज राष्ट्रवीर महाराणा प्रतापसिंह यांच्या ४८१ व्या जयंती दिनी महाराणा प्रताप उद्यान निगडी येथे भव्य रक्तदान शिबीराचे यशस्वी आयोजन केले होते..

रक्तदान शिबिरात अनेक तरूणांनी रक्तदान केले यावेळी रक्तदान करणा-या प्रत्येक रक्तदात्याला वाफेचं मशिन सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
