अखेर ऑटोक्लस्टर कोविड सेंटर मधून स्पर्श ची हकालपट्टी आयुक्त राजेश पाटील ऍक्टिव्ह मोडमध्ये…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिपरी- दि ९ मे २०२१
पिंपरी चिंचवड महापालिकेचे कोव्हिड हॉस्पिटल चालविणाऱ्या स्पर्श संस्थेचे काम काढून घेण्याचा मोठा निर्णय महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी घेतला आहे. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक कुंदन गायकवाड व विकास डोळस यांनी चांगलाच समाचार घेत गोंधळ घातला होता . त्यानंतर भाजप च्या च अनके नगरसेवकांनीही त्यांना पाठिंबा देत त्यांचे काम काढून घेत पाठिंबा दर्शवला होता. माजी महापौर योगेश बहल यांनीही हल्लाबोल करत तेथे होत असलेल्या प्रकाराचा कुंदन गायकवाड व विकास डोळस यांनी उघड केल्याने त्यांचे आभार मानले व स्पर्श चा कठोर शब्दात निषेध वेक्त केला होता व त्यांचे काम ताबडतोब काढून घ्यावे व तेथे असलेल्या कामगारांना जास्त पगार देऊन इकडे वर्ग करून घ्यावे असेही सांगितले होते. नंतर महापौर माई उर्फ उषा ढोरे यांनीही आयुक्तांना १० दिवसाची मुदत दिली होती. त्याचाच एक भाग म्हणून आणि सगळे पाहून घेऊन आयुक्तांनाही ऍक्टिव्ह मूड मध्ये येऊन कारवाई केली त्यांच्या या कारवाई चे स्वागत होत असल्याचे पाहायला मिळते.
चिंचवड येथील ऑटो क्लस्टर कोव्हिड हॉस्पिटलमधील रुग्णांना सेवा देण्याचं कंत्राट त्यांना देण्यात आलं होतं. मात्र त्या फॉर्च्युन स्पर्श हेल्थकेअर संस्थेचे अनेक गैरप्रकार समोर आले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई न केल्यास शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा इशारा पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिला होता.

त्यानंतर पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी स्पर्श संस्थेची उचलबांगडी केली. मोफत बेडसाठी एक लाख रुपयांची मागणी केल्याची बाब समोर आली होती. यावरून महापालिका सभागृहात तब्बल पाच तास वादळी चर्चा झाली. अनेक नगरसेवकांनी तोंड सुख घेतानाच, स्पर्श संस्थेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. तसा गुन्हा दाखल होताच, स्पर्शच्या दोन डॉक्टरांसह चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या.

मग रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणी एका वॉर्ड बॉयला अटक झाली. ही उजेडात आलेली दोन ताजी प्रकरणं तर याआधीच महापालिकेकडून बनावट बिलं देऊन लुबाडल्याची चौकशी ही सुरु आहे. बेडसाठी आकरलेले पैसे आणि रेमडेसिवीरचा काळाबाजार या प्रकरणात पोलिसांनी कसून चौकशी केली. तेव्हा आणखी प्रकरणं समोर येऊ लागली.

एकामागे एक प्रकरणं समोर येत असल्याने कोरोना रुग्ण आणि नातेवाईकांमध्ये असंतोष वाढू लागला होता. ही बाब पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आली होती. स्पर्शच्या सेवेवरून तोंडी तक्रारींचा तर भडीमारच सुरू होता. म्हणूनच पोलीस आयुक्तांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त करत, स्पर्शवर कारवाईची मागणी केली होती. त्यालाच अनुसरून पालिका आयुक्तांनी स्पर्शला घरचा रस्ता दाखविला. त्यामुळे उद्यापासून महापालिका इथं सर्व रुग्णांना सेवा देणार आहे. स्पर्शच्या व्यवस्थापनाची इथून हकालपट्टी झाली असली तरी स्टाफ मात्र तसाच कार्यरत राहणार आहे. या स्टाफला महापालिकेकडे वर्ग करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *