महिला दिनानिमित्त घोडेगाव येथील महाविद्यालयात कार्यशाळा संपन्न

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
०९ मार्च २०२२

घोडेगाव


घोडेगाव येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित बी. डी. काळे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन पुणे ग्रामीण पोलीस सौ.भाग्यश्री भोर – पडवळ यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता विद्या मंदिराच्या प्राचार्य सौ. मोहिनी खेडकर या होत्या. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री.सुरेशशेठ काळे,खजिनदार श्री.शिवदास काळे,स्कूल कमिटीचे चेअरमन श्री. अजितशेठ काळे,महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अॕड.संजय आर्विकर,प्राचार्य डॉ.इंद्रजित जाधव,उपप्राचार्य प्रोफेसर डॉ.ज्ञानेश्वर वाल्हेकर इ.नी महिला दिनानिमित्त उपस्थित विद्यार्थिंनीना शुभेच्छा दिल्या.

या कार्यशाळेमध्ये सौ. भाग्यश्री भोर – पडवळ यांनी ‘महिला सुरक्षा आणि मार्शल आर्ट’ या विषयावर व्याख्यान दिले.तसेच महाविद्यालयाच्या इतिहास विभागातील सहाय्यक प्राध्यापिका डॉ. चांगुणा कदम यांनी ‘महिला सक्षमीकरण’ या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. तसेच श्री. जयेश थोरात आणि श्री.अमोल उघडे यांनी ‘मार्शल आर्ट आणि स्वसंरक्षण’ या विषयावर उपस्थित विद्यार्थिनींना प्रात्यक्षिकासह कराटेचे प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणातील माहितीचा वापर आपत्कालीन परिस्थितीमध्ये मुलींनी कसा करावा याचे प्रात्यक्षिकासह सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे संयोजन कार्यक्रम अधिकारी डॉ.वल्लभ करंदीकर, प्रा.पोपटराव माने,विद्यार्थी विकास मंडळाचे अधिकारी डॉ.गुलाबराव पारखे इ.नी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. माणिक बोराडे यांनी केले तर सूत्रसंचालन कु.तन्वी देशमुख यांनी केले. प्राध्यापिका रेश्मा शेटे यांनी या कार्यक्रमाचे आभार मानले.उपस्थित महिला प्राध्यापिका व विद्यार्थिंनींचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *