कविता म्हणजे शब्दांची रांगोळी नसते.- जेष्ठ कवी विठ्ठल वाघ..

रोहित खर्गे
विभागीय संपादक

भोसरी – दि १२ जुलै २०२१
महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी, लायन्स क्लब इंटरनॅशनल यांच्या वतीने राज्यस्तरीय ऑनलाइन काव्यस्पर्धा आयोजन करण्यात आली होती.राज्यभरातुन आलेल्या १४७ कविता परीक्षकांच्या मार्फत निवडण्यात आल्या. पाऊस आणि निसर्ग या विषयावर कविता मागविण्यात आल्या होत्या. परिक्षकांनी आलेल्या कवितेतून पाच पारितोषिक विजेते निवडले.या स्पर्धेचा निकाल ११ जुलै रोजी ऑनलाइन पध्दतीने वात्सल्य हॉस्पिटल लांडेवाडी येथील सभागृहात जाहीर करण्यात आला.
प्रथम क्रमांक डॉ.नीलम गायकवाड, द्वितीय क्रमांक माधुरी ठाकूर ,तृतीय क्रमांक सुरेश कंक, चतुर्थ क्रमांक वर्षा बालगोपाल, मंजुषा कौटकर आणि पाचवा क्रमांक मीनाक्षी पाटोळे आणि शिल्पा जोशी यांना विभागून देण्यात आला आहे, सदर काव्यस्पर्धा ऑनलाइन घेण्यात आली,याप्रसंगी कविवर्य डॉ.विठ्ठल वाघ,महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, गझलकार नितीन देशमुख,कवी भरत दौंडकर, प्रांतपाल लायन अभय शास्त्री यांनी कवींनी कविता कशी लिहावी, शब्द कसे असावेत, आशय कसा असावा, कविता सादरीकरण कसे असावे यासाठी कवींना बहुमोल मार्गदर्शन केले. यावेळी डॉ विठ्ठल वाघ म्हणाले– कवींनी आभासी कविता लिहू नये. र ला र आणि ट ला ट अशी कविता होत नाही. कविता आत्म्यातून आली पाहिजे. या कार्यक्रमात डॉ. रोहिदास आल्हाट,मसाप भोसरी शाखेचे अध्यक्ष मुरलीधर साठे,पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, बांधकाम व्यावसायिक सुदाम मोरे,लायन्स क्लब भोजापूर गोल्डच्या अध्यक्षा सुरेखा साबळे ,यांची प्रमुख उपस्थिती होती,कार्यक्रमाची सुरुवात कवी राजेंद्र वाघ यांच्या ‘निळे निळे गं आभाळ.. झालं काळ काळ चल पावसात जाऊ भिजू पावसात’ या गेय कवितेने झाली,कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी केले . महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी शाखेचे अध्यक्ष मुरलीधर साठे यांनी कार्यक्रमाची संकल्पना सांगितली. ते म्हणाले पहिल्या पाच क्रमांकांच्या कवींच्या कविता गदिमा कवितामहोत्सवात सादर करण्यात येतील. या कवींचा सन्मान म्हणून गदिमांच्या नावाने पारितोषिक दिले जाईल. सूत्रसंचालन आचार्य दिगंबर ढोकले यांनी केले तर आभार डॉ. सुरेखा साबळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मयूर साठे,व मधुर साठे,यांनी परिश्रम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *