महिला दिनाच्या पूर्वसंध्येला रक्तदान शिबिरातून दिला महिलांना सन्मान…

पिंपरी-चिंचवड
07/03/2021

रक्त आटऊन जी कुटुंबासाठी झिझते, अपार कष्ट आणि मेहनत घेते त्या आईसाठी, ताईसाठी ” महीला दिनाच्या पूर्वसंध्येला” राष्ट्रवादी पदवीधर संघातर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
शिबिराचे उद्घाटन शिवसेना नेत्या सुलभा उबाळे , काँग्रेस शहर अध्यक्षा गिरिजा कुदळे आणि राष्ट्रवादी महिला कार्याध्यक्षा पुष्पा शेळके आणि मैत्री व्यासपीठाच्या अपर्णा मिसाळ यांच्या हस्ते झाले.
यावेळी सुलभा उबाळे म्हणाल्या की महिला दिवस ३६५ दिवसातून एकच दिवस नसावा. महिला ही घरासोबत देशाचा गाडा चालऊ शकते. गिरिजा कुदळे म्हणाल्या की आज व्यासपीठावर १-२ पुरुष सोडले तर सगळ्याच महिला आहेत, हा खरा महिलांचा सन्मान आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादीचे रविकांत वरपे म्हणले की माधव पाटील यांनी या निमित्ताने पिंपरी चिंचवड शहरात महाविकास आघाडीचा प्रयोग केला आहे.


रक्तदान शिबिर हा त्या महिलेला दिलेल्या सन्मानाचा एक भाग आहे असे पदवीधर चे अध्यक्ष माधव पाटील म्हणाले.
यावेळी राष्ट्रवादी महिला बचत गटाच्या अध्यक्षा कविता खराडे , युवती अध्यक्षा वर्षा जगताप , संगीता कोकणे , मनीषा गटकळ,शिल्पा बिडकर, स्वप्नाली असोले, पल्लवी पांढरे, आशा धनवे,


शबनम पठाण , शारदा मुंडे , मा. नगरसेवक निलेश पांढरकर राष्ट्रवादी कामगार सेलचे किरण देशमुख ,उपाध्यक्ष अकबर मुल्ला
शक्रुल्ला पठाण, निलेश पुजारी , अभिजित आल्हाट, हमीद शेख , प्रदेश युवक सरचिटणीस लाला चिंचवडे ,सामाजिक न्यायचे अध्यक्ष विनोद कांबळे तसेच पदवीधरचे कार्याध्यक्ष युनूस शेख आणि पदाधिकारी सुप्रीत जाधव , वंदना पेडनेकर ,गणेश उबाळे,अभिजित घोलप, धीरज आंब्रे , किशोर निकम , दिपाली निर्मल,रोहिणी वारे, ओमकार नायडू आदी उपस्थित होते.
सुबेदार सुरेश धनवे यांनी आभार मानले.