8 मार्च जागतीक महिला दिन विशेष । आंतरराष्ट्रीय महिला दिन एक दिवसा पुरता का होईना स्वीकारण्याची मानसिकता अनुभवतो आहोत हे ही नसे थोडके… – डॉ. भारती चव्हाण मानिनी फौंडेशन

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी

आज ०८ मार्च या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा देण्याचे सर्व सामाजिक स्तरावर स्वागत होऊ लागलेले आपण अनुभवतो आहोत. ०८ मार्च हा महिला दिन म्हणून स्वीकारण्याची मानसिकता अनुभवतो आहोत. घरात दारात , कार्यालयात, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक सर्वच क्षेत्रात आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या जात असतात ही निश्चितच महिलांच्या दृष्टीने ही सकारात्मक बाब मानावी लागेल.
या सकारात्मक मानसिकतेच्या मागील संघर्ष, वेळ, वर्ष याचा विचार केला असता आणि आजची महिलांची सामाजिक स्थिती पाहिली असता आपण या सकारात्मक मानसिकतेबद्दल समाधानी असावे की नाही हा गहन प्रश्न आहे.
१७ व्या शतकात देखील मेरी वोलस्टोन सारख्या महिलेने मुलींचे शिक्षण आणि जडणघडण हे पुरुषांना आवडणारे आणि पुरुषी वर्चस्व असणारे संस्कार मुलींवर का केले जातात यावर लढा देत होती.

१८ व्या शतकात मरियन या ऑस्ट्रेलियन महिलेने महिलांना नोकरी आणि महाविद्यालयीन प्रवेश देण्यासंदर्भात लढा दिला होता.
१८ व्या शतकाच्या अखेरीस न्युझीलँड मध्ये राष्ट्रीय निवडणुकीत महिलांना मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी चळवळ उभारली गेली. एमिलीन आणि कॅरीलिन या ब्रिटिश महिलांनी महिलांना मूल जन्माला घालण्याचा अधिकार असावा यासाठी देखील लढा दिला.
१९ व्या शतकाच्या सुरुवातीस पॅरिसमध्ये महिलांना नोकरी आणि मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी ३०० निदर्शने करण्यात आली होती.
१९०८ मध्ये न्यूयॉर्क येथे वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री महिला कामगार दहा तासांचा दिवस, महिलांची सुरक्षितता आणि लिंगभेद नष्ट करून समान वेतन कायद्यासाठी रस्त्यावर उतरल्या होत्या.
थोडक्यात काय आंतरराष्ट्रीय महिला दिनाची चळवळ १७ व्या शतकापासून उभारली गेली होती ती आज २१व्या शतकात देखील चालूच आहे. तेव्हापासून विविध क्षेत्रातील शेकडो, हजारो, लाखो स्त्रीयांनी संघर्ष आणि समर्पण करून स्त्रियांसाठीच्या विविध ह