आळेफाटा परीसरात टोमॅटो लागवडीला सुरुवात…

फोटो – आळेफाटा परिसरातील राजुरी (ता.जुन्नर) या ठिकाणी चालु असलेली टोमॅटो ची लागवड

आळेफाटा, (विभागीय संपादक रामदास सांगळे)

जुन्नर तालुक्याच्या पुर्व भागातील आळेफाटा, आळा,वडगाव आनंद,राजुरी, बोरी बुद्रुक, साळवाडी,जाधववाडी या परिसरात दरवर्षी मोठया प्रमाणात टोमॅटो या पिकाची लागवड मोठया प्रमाणात होत असते .याहीवर्षी टोमॅटो ची पहील्या टप्प्यातील लागवड सुरू झालेली दिसुन येत आहे. यावर्षी उन्हाळ्यात या परिसरात शेतीसाठी मुबलक असे पाणी असल्याने मोठया प्रमाणावर लागवडी चालु असल्याने दिसुन येत आहे. तसेच बहुतेक शेतकरी हे बेड पद्धतीचा वापर करून लागवड करताना दिसुन येत आहे. तसेच टोमॅटो च्या विक्री साठी प्रसिद्ध असलेली कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरची नारायणगाव या ठिकाणाहून टोमॅटो परदेशात निर्यात चालु केल्याने चांगली बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.