ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने नारायणगावतील ९० वर्षे वयावरील ज्येष्ठांचा सन्मान

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
०४ ऑक्टोबर २०२२

नारायणगाव


जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने नारायणगावतील श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने नारायणगाव परिसरातील ९० वर्ष व त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांचा त्यांच्या घरी जाऊन सन्मान व सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रमेश पाटे, शिवाजीराव गायकवाड, उपाध्यक्ष शिवाजीराव गायकवाड, सचिव सदाशिव भोसले, कार्यकारणी सदस्य कोते गुरुजी, मेहत्रे गुरुजी, रत्नाकर सुबंध, अरविंद मेहेर, मारुतीराव डेरे, शंकराव कोल्हे, विजय शिंदे, बाबुराव डोके, बाळासाहेब पाटील, निवृत्ती गायकवाड, बबनराव पानसरे, अरुण औटी गुरुजी, प्रभाकर डेरे, खेबडे गुरुजी, सुखदेव डेरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. ९८ वर्ष वयाचे दत्तात्रय चिमाजी वाजगे यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.


ज्येष्ठ नागरिकांसाठी सातत्याने कार्यरत असणाऱ्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने सतत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. यामधून ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या तसेच त्यांच्या आरोग्य विषयी घटनांचा उहापोह केला जातो अशी माहिती अध्यक्ष रमेश पाटे यांनी दिली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *