आंबेगावात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेला यापुर्वी आपल्याकडे असलेल्या ग्रामपंचायत राखण्यात यश…

घोडेगाव प्रतिनिधी
ब्युरोचीफ मोसीन काठेवाडी

      आंबेगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींचा निकाल पहाता  राष्टवादी काँग्रेस व शिवसेनेला आपल्याकडे यापुर्वी असलेल्या ग्रामपंचायत राखण्यात यश आले. मंचर ग्रामपंचायतवर महाविकास आघाडीने सत्ता मिळवली तर अशा प्रकारे महाविकास आघाडीचा झालेला प्रयोग अजून काहि ठिकाणी यशस्वी ठरला.

            आंबेगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींपैकी कारेगाव, चिंचोली, भराडी व साकोरे या चा ग्रामपंचायती यापुर्वी बिनवीरोध झाल्या आहेत. तर उर्वरीत २५ ग्रामपंचायतींमध्ये १७५जागेंसाठी ३६६ उमेदवार उभे होते. यामध्ये गावडेवाडी, पिंगळवाडी/लांडेवाडी, कोळवाडी/कोटमदरा, पिंपळगांव तर्फे महाळुंगे, लौकी, शिरदाळे, जवळे, काठापुर, शिंगवे, गिरवली, शेवाळवाडी, खडकवाडी, भागडी, एकलहरे, खडकी, पेठ, महाळुंगे पडवळ, वळती, थुगांव, काळेवाडी/दरेकरवाडी,  रानमळा, धोंडमाळ/शिंदेवाडी, कोलदरा/गोनवडी,अवसरी खुर्द यांची  मतमोजणी घोडेगाव येथे तहसिल कार्यालयात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांत अधिकारी सारंग कोडोलकर  यांनी काम पाहिले. मतमोजणी पुर्वी तहसिलदार रमा जोशी यांनी उपस्थित उमेदवार, प्रतिनिधी व कर्मचारी यांना गोपनीयतेची शप्पथ दिली.