पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद…

महाराष्ट्र पोलीस दलासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण

अतुलसिंह परदेशी, मुख्य संपादक

पिंपरी-चिंचवड, 20/01/2021

1997 बॅच चे महाराष्ट्र पोलीस दलातील एक डॅशिंग, कणखर पण तितकाच संवेदनशील, कायद्यासोबत अध्यात्मिक व संत साहित्यावर प्रचंड पगडा असणारे, सर्व सामान्य लोकांना “माझा अधिकारी” वाटावा असे जनताभिमुख पोलीस प्रशासन निर्माण करणारे पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त IPS कृष्णप्रकाश सर यांना अत्यंत गौरवास्पद असा “आयर्न मॅन किताब” पटकविल्याबद्दल त्यांच्या नावाचा समावेश “वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड, लंडन” मध्ये करण्यात आला आहे…

भारतीय प्रशासकीय सेवेतील आयपीएस – आयएएस, संरक्षण दल, आर्म फोर्स, सनदी, पॅरामिलिटरी मधील वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होणारे आयुक्त कृष्ण प्रकाश हे देशातील पहिलेच अधिकारी ठरले आहेत.या गौरवास्पद कामगिरी करिता वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड्स लंडनचे सचिव श्री. अनुराग पांडेय, सचिव डॉ. प्रदीप मिश्रा यांच्या हस्ते श्री. कृष्ण प्रकाश यांना प्रमाणपत्र देण्यात आले.

ब्रिटीश संसदचे सदस्य श्री. वीरेंद्र शर्मा, श्री. आलोक शर्मा, वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड्स इंग्लंडचे चेअरमन डॉ. दिवाकर सुकुल व वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड्स इंग्लंडचे भारतातील अध्यक्ष तथा दिल्ली उच्च न्यायालयातील वकील ॲड. संतोष शुक्ला आदींनी आयुक्त श्री. कृष्ण प्रकाश यांना हा बहुमान मिळाल्या बद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

पोलीस दल हे त्यांच्यावर असलेल्या अतिरिक्त कामकाजामुळे व तणावामुळे, आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता CSR मधून प्रचंड निधी उभा करत आयुक्तालयातील प्रत्येक पोलीस ठाणेचा प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांना नुकतेच मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे हस्ते फिटनेस बँड घड्याळ व सायकली चे वाटप सरांनी घडवून आणले. माझ्या सोबत माझा प्रत्येक जवान फिट राहिला पाहिजे , कणखर राहिला पाहिजे व न्याय मिळवून देण्यासाठी संवेदनशील राहिला पाहिजे हा संदेश सरांच्या उपक्रमातून लक्षात येतो एका बाजूला विधिसंघर्षग्रस्त बालकांसाठी विविध संस्था मार्फत विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे , त्याना सन्मान मिळवून देणे, तर दुसऱ्या बाजूला पोलिसांची पाल्य याना उधोग धंदे साठी 5 ते 50 लाख रुपये पर्यंत कर्ज व प्रशिक्षण देणे असे नाविन्यपूर्ण उपक्रम सरांनी पिंपरी चिंचवड आयुक्तालयात हाती घेतलेच नाही, तर ते यशस्वी होण्यासाठी नियमित प्रयत्नशील असतात.

मालेगाव , बुलढाणा, सांगली , अहमदनगर , मुंबई अशा प्रतेक ठिकाणी सरांनी त्या त्या पोस्टिंग ला पुरेपुर न्याय दिलेला आहे. म्हणूनच “कृष्णप्रकाश” हे नाव सबंध राज्यात अत्यंत आदराने घेतले जाते.

वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्डमध्ये “कृष्णप्रकाश” हे नाव आज नोंदवल्या गेल्याने महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव आणखी उजळून निघाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *