१७ जानेवारीला ग दि माडगूळकर यांच्या माडगूळे गावी रंगणार २८ वा गदिमा काव्यमोहत्सव – जेष्ठ साहित्यिक पुरुषोत्तम सदाफुलें

रोहित खर्गे, विभागीय संपादक

आटपाडी दि. ४ जानेवारी
माणदेशाचे थोर साहित्यिक व आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त होणारा यंदाचा २८ वा गदिमा काव्य महोत्सव हा ग.दि. माडगूळकरांच्या गावी म्हणजेच आटपाडी तालुक्यातील माडगूळे येथे होणार आहे. नारायण सुर्वे कला अकादमी,महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद,महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा-आटपाडी, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा-भोसरी व माडगुळे ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव होणार असल्याचे आटपाडी येथे झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आले.

या महोत्सवामध्ये गदिमा वारसदार कवी, महाराष्ट्रातील सहा कवितासंग्रहांना पुरस्कार, गदिमा जीवन गौरव पुरस्कार,शिवाजी सावंत यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा मृत्युंजय साहित्य पुरस्कार, गदिमा लोककलावंत पुरस्कार व गदिमा जन्मशताब्दी सांस्कृतिक पुरस्कार आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांच्या नियोजनाबाबत आज आटपाडी येथे बैठक संपन्न झाली.

१७ जानेवारी २०२१ रोजी हा गदिमा महोत्सव संपन्न होत असून आयोजनाबाबत बोलावलेल्या बैठकीसाठी गदिमा महोत्सवाचे स्वागताध्यक्ष तथा नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा आटपाडी चे अध्यक्ष अमरसिंह(बापु) देशमुख,महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा भोसरीचे अध्यक्ष मुरलीधर साठे, कार्यवाह प्रा. दिगंबर ढोकळे ,प्रसिद्ध कवी राजेंद्र वाघ, प्रा. विश्वनाथ जाधव, मुक्तेश्वर माडगूळकर, सरपंच संजय विभुते,प्रा. हेमंत कुलकर्णी,वसंत पाटील, गदिमा हायस्कूल चे मुख्याध्यापक बी..ए. पाटील, सुरेश गायकवाड, प्रा.नारायण आदलिंगे, माणदेशातील ज्येष्ट साहित्यप्रेमी आटपाडीचे सादिक खाटीक, प्रा.कवी विजय शिंदे, दिनेश देशमुख,कवी सुनील जवंजाळ, मुकुंद वलेकर, महादेव मंडले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले म्हणाले, की यंदाचा गदिमा महोत्सव हा माडगूळकरांच्या गावी होत असताना आम्हा सर्व साहित्यिकांना प्रचंड आनंद होत आहे, गेली सत्तावीस वर्ष आम्ही हा महोत्सव आयोजित करत आहोत. या वर्षीचा महोत्सव अतिशय नाविन्यपूर्ण होणार आहे.

नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे यांनी गदिमा महोत्सवात आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा उपस्थितांसमोर मांडली.माणदेशातील साहित्यप्रेमी व माडगुळे ग्रामस्थांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी करण्याचा संकल्प त्यांनी केला. माणदेशातील साहित्य विश्वाचे नेतृत्व माडगूळे केंद्रस्थानी ठेवून माडगूळकर परिवाराचे वतीने गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी करावे . अ .भा . मराठी साहित्य संमेलनाचे पाच अध्यक्ष देण्याऱ्या आटपाडी तालुक्यात अ.भा. मराठी साहित्य संमेलन व्हावे यासाठी भविष्यात मोठे प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा साहित्यप्रेमी सादिक खाटीक आटपाडी यांनी यावेळी व्यक्त केली . गदिमा महोत्सव कशा पद्धतीने साजरा करायचा याबाबतच्या विविध संकल्पना मुरलीधर साठे, प्रा. विश्वनाथ जाधव, सादिक खाटीक यांनी मांडल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा भोसरी चे कार्यवाह दिगंबर ढोकळे यांनी केले तर आभार प्रा. विजय शिंदे हे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *