राख्यांनी दुकाने सजली : स्टोन च्या राख्यांना ग्राहकांची पसंती

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
०९ ऑगस्ट २०२२

आळेफाटा


भावा बहिणीचा पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंधेला बेल्हे,आळेफाटा,राजुरी,आणे परिसरातील दुकानांत राख्या खरेदीसाठी ग्राहकांची मोठी झुंबड लागली होती. डिझाईनच्या राख्यांना ग्राहकांची पसंती जास्त आहे. या सणाला भाऊ बहिण आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी परगावी जात असतात. रक्षाबंधनाचा आधीच राख्या खरेदी करून रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण आपल्या भावाकडे राखी घेऊन जात असते. त्यामुळे निमित्त मंगळावर (दि ९) रोजी दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी ग्राहकांनी गर्दी केली होती.आपल्या भावाला आपल्या आवडीची राखी बांधावी अशी बहीनीची अपेक्षा असल्याने चांगली राखी खरेदी केली जाते.

शेकडो डिझाईनच्या राख्या यावर्षी बाजारामध्ये उपलब्ध आहेत.यावर्षी स्टोनच्या नवीन राख्या बाजारात आल्यामुळे स्टोनच्या राख्यांना बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे राख्या विक्रेत्यांनी सांगितले.परंतु राखी कोणतीही असो त्या राखीला नव्हे तर बंधनाला महत्त्व असते हे ग्राहकांनी लक्षात घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे.५ रुपये ते ५०० रुपयां पर्यंत च्या राख्या बाजारात उपलब्ध आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *