आंबेगाव : – ( ब्युरो चिफ मोसीन काठेवाडी )
सावित्रीमाईच्या असीम त्यागातून मुक्तीची अक्षरे गिरविण्याची कवाडे भारतीय स्त्रियांना खुली झाली या शिक्षणाच्या जोरावर आज देशात महिला भगिनी विविध क्षेत्रात उंच भरारी घेत आहेत. असे गौरवोद्वार भिमाशंकर सहकारी कारखान्याचे युवा संचालक प्रदीपदादा वळसे पाटील यांनी काढले.
युगप्रवर्तक प्रतिष्ठाण व यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय आंबेगाव गावठाण यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 190 व्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या निमित्त अध्यक्ष स्थानावरून प्रदीप वळसे पाटील बोलत होते या वेळी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त माध्यमिक विद्यालयात निबंध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्या निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरणचा कार्यक्रम पार पडला.
दरवर्षी प्रमाणे या वर्षी क्रांतिज्यीती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त आंबेगाव तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारया महिलांना आदर्श महिला पुरस्कार दिला जातो तो या वर्षाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श महिला पुरस्कार एकलहरे गावच्या आदर्श मुख्याध्यापिका मनीषाताई कानडे यांना देण्यात आला तर 350 बचत गटाच्या माध्यमातून 3500 महिलांना संघटित करून रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या यशवर्धिनी स्वयं सहाय्य संघाच्या अध्यक्ष योगिता बोऱ्हाडे याना राजमाता जिजाऊ मा साहेब आदर्श महिला पुरस्कार देण्यात आला.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा सभापती प्रकाश घोलप ,युगप्रवर्तक प्रतिष्ठाणचे अध्यक्ष गौतमराव खरात, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस अजय आवटे,घोडेगाव नगरीच्या सरपंच क्रांतीताई गाढवे ,माजी सरपंच रुपालीताई झोडगे, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी महिला उपाध्यक्ष ज्योतीताई घोडेकर ,ज्ञानलक्ष्मी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब कानडे, आंबेगाव गावठाण चे सरपंच निलेश घोलप, भीमशक्तीचे अध्यक्ष किशोर वाघमारे,परिवर्तन प्रतिष्ठाणचे अध्यक्ष दयानंद मोरे युगप्रवर्तक प्रतिष्ठाणच्या संचालिका कविता खरात राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे तालुका उपाध्यक्ष राजू पानसरे तंटामुक्तीचे अध्यक्ष कुमार घोलप, अविनाश असवारे, अमित रोकडे ,सामाजिक कार्यकर्ते लाडबा खरात आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक युगप्रवर्तक प्रतिष्ठाण चे अध्यक्ष गौतमराव खरात यांनी केले सूत्र संचालन अनंता लोहकरे सर यांनी केले तर आभार शाळेचे मुख्याध्यापक अविनाश ठाकूर सर यांनी मानले