जुन्नर (वार्ताहर) – आळेफाटा (ता.जुन्नर) येथे मातोश्री स्वीट दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी ११ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम,मिठाई व खाण्याच्या वस्तू चोरून नेल्याची घटना सोमवार (दि १४) मध्यरात्री ३ वा च्या सुमारास घडली असल्याची माहितीचे स्वीट मार्टचे मालक संकेत घोडेकर यांनी दिली .
आळेफाटा बस स्थानकाच्या परिसरात संकेत घोडेकर यांचे मालकीचे मातोश्री स्वीट दुकान आहे .अज्ञात दोन चोरट्यांनी मध्यरात्री ३ वा मिनिटांच्या सुमारास शटर उचकटून आत मध्ये प्रवेश केला व गल्यातील ११ हजार ५०० रुपये रोख रक्कम व इतर खाण्याचे व मिठाई अज्ञात चोरट्यांनी एका पिशवीत भरून चोरून नेले आहे व स्वीट मार्ट मधील सर्व ड्रॉव्हर उचकटून काही वस्तू चोरून नेल्या आहेत . चोरट्यांनी जाताना दुकानातील सर्व वस्तू अस्ताव्यस्त करून ठेवल्या होता.

याबाबत घोडेकर यांनी आळेफाटा पोलिसांना कळले असता पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन सविस्तर माहिती घेतली आहे. याबाबत पुढील तपास आळेफाटा पोलीस हे करीत आहेत.