जुन्नरच्या आदिवासी भिवाडे भागातील भूस्खलनाची पाहणी

तज्ज्ञांकडून भूगर्भ सर्वेक्षण करण्याची शिवसेना उपनेते, संपर्कप्रमुख शिवाजीराव आढळराव यांची मागणी

माजी आमदार शरद सोनवणे यांच्या समवेत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली पाहणी

नारायणगाव (किरण वाजगे)
जुन्नरच्या तालुक्याच्या आदिवासी भिवाडे गावच्या भूस्खलनाचे तज्ज्ञांकडून भूगर्भ सर्वेक्षण करावे अशी मागणी शिवसेना उपनेते, संपर्कप्रमुख तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली आहे.

जुन्नर च्या आदिवासी भागातील भिवाडे येथे जमिनीला ३०० मीटर लांबीची भेग पडल्याने जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे व शिवसेना पदाधिकाऱ्यांसह तात्काळ आढळराव यांनी पाहणी केली.

येथील जमीन खचल्याने काही घरांचे नुकसान होऊन विजेचे खांब उन्मळून पडले आहे. ही बाब अतिशय गंभीर असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या परिसराचे तज्ज्ञांकडून भूगर्भ सर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे. तसेच यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रशासनाकडून पुढील जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी योग्य उपयोजना करण्याबाबत मी आग्रही राहणार आहे. असे आढळराव यांनी सांगितले.

यावेळी माजी खासदार आढळराव यांच्या समवेत जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, जिल्हा सल्लागार संभाजी तांबे, हिरडा प्रकल्पाचे चेअरमन काळू शेळकंदे, विकास राऊत, बन्सी चतुर, सचिन चव्हाण, सूर्यकांत हांडे, भिवाडे बुद्रुकचे सरपंच नामदेव विरणक, उपसरपंच नंदाताई विरणक, यशवंत सुपे, भिवाडे खुर्दच्या कमल शेळकंदे, शुभम वाजे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *