धर्मादाय अंतर्गत असलेल्या सर्व हॉस्पिटल मधुन रुग्णांना मोफत उपचार मिळावेत : बाबा कांबळे

गोरगरीब निर्धन कष्टकरी जनतेला मोफत उपचार मिळावेत या मागणी साठी कष्टकरी कामगार पंचायत वतीने धर्मादाय आयुक्त दिलिप देशमुख ,उपयुक्त नवनाथ जगताप , यांची भेट घेतली आणि चर्चा केली , तसेच धर्मादाय अंतर्गत पुणे विभागात येणारे एकुण 54 हॉस्पिटलच्या मुख्याधिकारी यांची देखील भेट घेऊन निवेदन दिले आहे यात आदित्य बिर्ला, डि. वाय पाटील हॉस्पिटल, धनश्री , स्टर्लिंग हॉस्पिटल सह इतर हॉस्पिटल मध्ये भेट देऊन , गोर गरिब निर्धन कष्टकरी जनतेला मोफत उपचार मिळावेत अशी मागणी केली आहे.

रिक्षा चालक , टपरी पथारी हातगाडी धारक ,कागद काच पत्रा वेचक , धुणी भाडी स्वयंपाक साफसफाई कामगार अश्या प्रकारे काबाडकष्ट करणाऱ्या जनतेला धर्मदाय आयुक्त अंतर्गत असलेल्या सर्व हॉस्पिटल मधुन मोफत उपचार मिळावेत अशी मागणी कष्टकरी कामगार पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी केली आहे.

या वेळी लोकशाही संस्था अध्यक्ष अजय लोंढे , भीमा कोरेगाव संघर्ष समिती अध्यक्ष अनिता साबळे ,आदी उपस्थित होते.

आत्ता पर्यंत धर्मादाय अंतर्गत निर्धन आर्थिक दुलबल घटकासाठी दोन हजार कोटी रुपयांचा आरोग्य मोफत उपचार झाले असल्याचे धर्मदाय उपायुक्त दिलिप देशमुख यांनी सांगितले गोर गरिबांना मोफत उपचार मिळाले पाहिजे असेही ते म्हणाले.

या वेळी बाबा कांबळे म्हणाले कोरोना कॉविड19 परिस्थित मदे बेड उपलब्ध नाही अगोदर ५० रु भरा अन्यथा उपचार केले जाणार नाही ,असे विविध कारणे सांगुन गोर गरीब जनतेला कष्टकरी जनतेला आरोग्य उपचार दिले जात नाही या मुळे गोर गरीब कष्टकरी जनतेची हेळसांड होत असुन अनेक व्यक्तीचा वेळेत उपचार न मिळाल्या मुळे जीव गमवावा लागला आहे.

या बाबत तक्रार करून देखील न्याय मिळत नाही या मुळे धर्मादाय