आपला आवाज न्यूज नेटवर्क चे मुख्य संपादक अतुलसिंह परदेशी कोवीड योद्धा पुरस्काराने सन्मानित

आपला आवाज न्यूज नेटवर्क

दि.27/12/2020

अश्वमेध युवा मंच चे अध्यक्ष गणेश कवडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व कोवीड योद्धा पुरस्काराचे वितरण

ओझर प्रतिनिधी (मंगेश शेळके) :- कोरोनाच्या काळात महाराष्ट्रात पडलेला रक्ताचा अपुरा पुरवठा लक्षात घेता व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत, अश्वमेघ युवा मंच ओझर, महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष गणेशभाऊ कवडे यांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ओझर या ठिकाणी भव्य रक्तदान शिबीर भरविले. गणेशभाऊ कवडे यांच्या प्रेमापोटी जवळजवळ दिवसभरात साडेच्या तीनशेच्या वरती लोकांनी या ठिकाणी रक्तदान केले.प्रत्येक रक्तदात्यास प्रोत्साहनपर भरपूर अल्पोपहार , ट्रकसुट व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.कोरोनाच्या काळात ज्या व्यकतींनी विशेष उल्लेखनीय कामगिरी केली त्यांना कोव्हीड योद्धा म्हणून सन्मानीत करण्यात आले.

यामध्ये मनसेचे पदाधिकारी मकरंद पाटे, आपला आवाज न्यूज चँनलचे मुख्य संपादक अतुल परदेशी , आरोग्य अधिकारी वर्षा गुंजाळ , आशा वरकर्स, अंगणवाडी सेविका, नर्स, डॉक्टर्स या़ंना कोव्हीड योद्धा म्हणून सन्मानीत करण्यात आले.तसेच गणेश कवडे यांना अभिष्टचिंतन करण्यासाठी अध्यक्ष बी.व्ही.मांडे, गटनेत्या आशाताई बुचके,नारायणगावचे सरपंच बाबू पाटे,चेअरमन सत्यशील शेरकर, जुन्नर नगरीचे उपनगराध्यक्ष दिपेशसिंह परदेशी, सु्वर्णा बनकर, आरोग्याधिकारी वर्षा गुंजाळ, पुणे शहर मनसे अधिकारी रूपाली ठोंबरे, विनोद औटी, संतोष दांगट, ,विघ्नहर देवस्थानचे सर्व पदाधिकारी , कामगार वर्ग ,ओझरचे सर्व ग्रामस्थ, मित्र परिवार व सर्व पत्रकार बंधू यावेळी उपस्थि