जांभोरी येथे बौद्धजन सहायक संघ यांच्या वतीने संयुक्त जयंती महोत्सव संपन्न
मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
१८ मे २०२२
जांभोरी
आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागात जांभोरी या गावात बौद्धजन सहायक संघ यांच्या वतीने संयुक्त जयंती महोत्सव प्रमुख व्याख्यात्या सुषमाताई अंधारे यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी पत्रकार किशोर वाघमारे, बौद्धजन सहायक संघाचे रमाकांत जाधव युगप्रवर्तक प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खरात, जंभोरी गावचे सरपंच केंगले ,मंचर गावचे संतोष देठे समता मित्र मंडळ अध्यक्ष व सभासद व माता रमाई महिला मंडळ अध्यक्ष व सभासद कवी व्यख्याते अक्षय साळवे प्राध्यापक नलावडे सर, नितीन सरोदे निलेश देठे , ग्रामसेवका खरात ताई आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात त्रिसरण पंचशील घेऊन करण्यात आली भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा जोतिबा फुले, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे , या महापुरुषांची जांभोरी गावातून भव्य मिरवणूक काढल्यानंतर मान्यवरांचे सन्मान करण्यात आले असून प्रमुख व्यख्याते सुषमाताई अंधारे यांचे व्याख्यान झाले नंतर अन्नदानाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय साळवे यांनी केले तर आभार बौद्धजन सहायक संघाचे शंकर आनंदा वाघमारे यांनी केले.