अमित गोरखे यांच्या वाढदिवसा निमित्त मोफत रॅपिड ऑंटी जेन्ट टेस्टिंग शिबिर नागरिकांचा चांगला प्रतिसाद

437 नागरिकांनी केली तपासणी

बातमीदार : रोहित खर्गे, विभागीय संपादक

पिंपरी चिंचवड: भाजप प्रदेश सचिव अमित गोरखे यांच्या वाढदिवसानिमित्त शाहूनगर येथे प्रभाग क्रमांक 10 शाहूनगर येथे नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्या वतीने मोफत रॅपिड कोरोना टेस्टिंग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिराचे उद्घाटन नगरसेवक केशव घोळवे, माजी उपमहापौर तुषार हिंगे नगर्सेविका अनुराधा गोरखे व श्री अमित गोरखे , प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, भाजपा उपाद्यक्षा सौ सुप्रिया चांदगुडे,व भाजपा मंडल अध्यक्ष श्री विजय जी शीनकर, यांच्या उपस्थितीत पार पडले.

या शिबिरास नागरिकांचा खूप सांगला प्रतिसाद मिळाला या शिबिरात एकूण 437 नागरिकांनी टेस्टिंग केले व त्यापैकी 7 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले.

भाजपा पदाधिकारी नंदा करे ,दिपाली कारंजकर ,अश्विनी तोरकड, स्वाती शहाणे, आशा मेटांगे, वैशाली बनकर,भाजपा प्रभाग अध्यक्ष गणेश कानूरकर व केवल पाटील,संदीप चव्हाण, उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड मनपाच्या आकुर्डी येथील हॉस्पिटल मधील डॉक्टर्स व नर्सेस च्या टीमने चांगली कामगिरी बजावली, शिबिरात डॉ सुनीता साळवे, डॉ राहुल साळुंखे,डॉ दीपक चौधरी ,डॉ रोहित जातकर,डॉ प्रदीप गायकवाड,डॉ दीपक पेठे,डॉ श्वेता जगताप,डॉ हरीश शेंडे,डॉ राहुल फरांदे,डॉ विकास फरांदे, गोरक्षनाथ कसबे यांनी काम पाहिले.