बातमीदार: रोहित खर्गे, विभागीय संपादक
पिंपरी: दि ३१ ऑक्टोबर तोडफोडीच्या घटना ताज्या असतानाच परत पिंपरी चिंचवडमध्ये दोन ठिकाणी टोळक्यांनी हैदोस घातला. पहिली घटना ही पिंपरी पोलिसांच्या हद्दीतील नेहरूनगर मध्ये घडली. तिथं वीस-पंचवीस वाहनांवर आलेल्या टोळक्याने सात ते आठ वाहनांची तोडफोड केली.


शस्त्र, लाठी, सिमेंट ब्लॉकचा यात वापर केला. प्रचंड दहशद माजवण्याचा प्रयत्न केला कारण हे भांडणाचे आहे. तर दुसरी घटना ही वाकड पोलिसांच्या हद्दीतील रहाटणीत घडली. एकमेकांना मारहाण केली आणि त्यानंतर एकाने टोळक्यासह समोरच्या तरुणाच्या घरावर दगडफेक करत त्याच्याच वाहनाची तोडफोड केली. याप्रकरणी आठ अटकेत आहेत.