बातमीदार : रोहित खर्गे, विभागीय संपादक
हिरवा निसर्ग हा भवतीने,
शहराला जोडूया हरित सेतूच्या मदतीने, शहरातील हरित क्षेत्रे व उद्योगांना पादचारी आणि सायकल मार्गाद्वारे जोडण्याचा उपक्रम , ही संकल्पना राबविणारे पिंपरी चिंचवड हे देशातील पहिले शहर- आयुक्त श्रावण हार्डीकर
पिंपरी दि २९ ऑक्टोबर, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील हरित पट्टे, उद्याने यांना जोडणारी हरितसेतु योजना लवकरच कार्यन्वयीत करणार. रस्त्याच्या कडेला मोठे फूटपाथ करणे. शहरातील काही भागात नॉन वाहतूक योजना आणणार. रस्ता हा नागरिकनसाठी आहे रस्त्याचे वेगवेगळे वापर करता येतात ते ग्रीन करणार म्हणजे कानेक्टड ग्रीन रस्ते करणार तेथे नॉन ट्रान्सपोर्ट असणार. हरित सेतू विकसित करण्याचा महत्वकांक्षी उपक्रम राबविण्यात येणार असून त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे व आपल्या अमूल्य सूचना द्याव्यात असे आवाहन आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी केले. महानगरपालिकेच्या सर्व उद्यानांना तसेच शहरात असणाऱ्या हरित क्षेत्रांना पादचारी मार्ग अथवा सायकल मार्गाने जोडले जाणार आहे. या बहुप्रतिक्षित उपक्रमाचा शुभारंभ आज २९ ऑक्टोबर २०२० रोजी होत आहे. ” CONNECTED GREEN” या महत्वपूर्ण मुद्यावर आधारित असलेल्या मूळ संकल्पनेतून हा उपक्रम स्मार्ट सिटी अंतर्गत राबविण्यात येणार आहे.
शहरातील नागरिकांना आरोग्यदायी वातावरण उपलब्ध व्हावे तसेच पर्यावरणपूरक जीवनमान अधिक उंचावण्यासाठी हा उपक्रम पथदर्शी ठरणार आहे. या शहराला राहण्यासाठी अतिशय उत्तम शहर बनविण्यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरणार आहे. पर्यावरणपूरक साधनांचा प्रभावी वापर करून शहरभर विखरलेल्या हरित क्षेत्रांना एकमेकांना जोडल्यास शहराची पर्यावरणीय गुणवत्ता वाढून त्याचा लाभ शहरवासीयांना होईल. शहर विकासात या उपक्रमाचे अनन्यसाधारण महत्त्व असणार आहे पिंपरी चिंचवड शहराला आर्थिकदृष्ट्या परवडणारी घरे व राहण्यायोग्य असलेल्या देशातील सर्वोत्तम शहर बनविण्यासाठी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. शहरातील आणि त्यांच्या आसपासच्या हिरव्यागार विस्तीर्ण जागांचा समावेश करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. सर्व बाबींचा व्यापक विचार करणारे क्षेत्र जोडणी विकास आराखडा महापालिकेने शहर विकासाच्या दृष्टीने तयार केला आहे. देशातील अशा प्रकारच्या आराखड्याची अंमलबजावणी करणारे पिंपरी-चिंचवड प्रथम शहर ठरणार आहे. शहरातील हरित पट्टे आणि विखुरलेल्या उद्योगांना जोड देण्याचे प्रमुख उद्दिष्ट समोर ठेवून हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
समर्पित सायकल मार्ग आणि पादचारी मार्गाचा वापर करून नागरिकांना सुरक्षितपणे एका हरित क्षेत्र अथवा उद्यानापासून इतर उद्यानांपर्यंत जाता येईल अशा प्रकारे या उपक्रमाची रचना करण्यात आली आहे . पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सद्यस्थितीत 184 विकसित केलेले उद्याने आहेत आणि शिवाय भविष्यातील विकासात्मक दृष्टिकोनातून काही ठिकाणी हरित क्षेत्रासाठी अतिरिक्त जागांचे आरक्षण ठेवले आहे . सिंगापूर पार्क कनेक्टर नेटवर्क , सिडणीचे कनेक्टेड ग्रीड, न्यूयार्क मधील कनेक्टेड पार्क, इटलीमधील कनेक्टेड फॉरेस्ट इत्यादी जागतिक स्तरावरील हरित सेतूंची उदाहरणे आहेत.
सन २०३० पर्यंत पिंपरी चिंचवड शहराला सर्वसमावेशक आर्थिक उत्पन्नाचे स्तोत्र आणि भारतातील राहण्यायोग्य चांगल्या शहर बनविण्याच्या धोरणात्मक विकासासाठी शहरातील विविध स्तरातील नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळावा अशी अपेक्षा आहे.