नागरिकांच्या व नगरसेवक राहुल कलाटे यांच्या सतत च्या पाठपुराव्याची रिलायन्स चे प्रोजेक्ट मॅनेजर ने घेतली दखल

बातमीदार : रोहित खर्गे, विभागीय संपादक

वाकड: दि २९ ऑक्टोबर, नगरसेवक/गटनेता शिवसेना श्री. राहुल कलाटे यांच्या सततच्या पाठपुरावा व ठिकठिकाणी होल्डिंग लावून नागरिकांना तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. त्याला प्रतिसाद देत नागरिकांनी तक्रारी केल्या त्या तक्रारीची दखल घेत आज नॅशनल हायवे मॅनेजर टेक. श्री. अनिल गोरड, कॅन्सटन्ट टीम लीडर श्री. जि.सि.झा, रिलायन्स प्रोजेक्ट मॅनेजर राकेश कोळी, मनपाचे स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. गट्टेवारसाहेब, मनपाचे इतर पदाधिकारी यांच्या सोबत आज ताथवडे येथे पुलाखाली साचलेल्या पाण्याची व वाकड, ताथवडे, पुनावळे येथील सर्व्हिस रोड मध्ये पडलेल्या खड्यांची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

हायवे मॅनेजर टेक. श्री. अनिल गोरड यांनी सांगितले कि तूर्तास आम्ही काम करून देऊ व आम्हास डायव्हरशनची परवानगी दिल्यास आम्ही ताथवडे व पुनावळे येथे नवीन पुल हि बांधून देऊ अशी देखील त्यांनी कल्पना दिली. त्यावेळी तेथील नागरिक हि उपस्थित होते.

त्याप्रमाणे नगरसेवक नगरसेवक/गटनेता शिवसेना श्री. राहुल कलाटे यांनी नॅशनल हायवेच्या आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना व मनपाचे स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. गट्टेवारसाहेब यांना मनपा आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील पाठपुरावा करण्याच्या सुचना केल्या.