पिंपळे सौदागर मधील स्मार्ट सिटी अंतर्गत चालू असलेली रस्त्याची कामे लवकर पूर्ण करा- विठ्ठल उर्फ नाना काटे

रोहित खर्गे
विभागीय संपादक
७ डिसेंबर २०२१

पिंपरी


प्रभाग २८ पिंपळे सौदागर येथील स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित करण्यात येत असलेल्या विविध रस्त्यांची यामध्ये गंगा पार्क चौक ते गोविंद यशदा चौक ते डेफोडील सोसायटी समोरील रस्ता, पोलीस चौकी ते गावठाण बुद्धविहार रस्ता, महादेव मंदिर ते स्मशानभूमी  रस्ता या रस्त्यांची पाहणी मा विरोधी पक्षनेते विद्यमान नगरसेवक श्री. विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी केली .तसेच रस्ते बनवताना ड्रेनेज लाईन, स्ट्रोम वॉटर लाईन, विविध पाण्याची लाईन, एम एस ई बी, एम एन जी एल. लाईन व इतर लाईन च्या कामाची माहिती घेतली. तसेच नागरिकांच्या घरासमोर तसेच वाहतुकीच्या रस्त्यावर पडलेल्या राडारोड्यामुळे नागरिकांना त्रास होतो त्यामुळे तो राडारोडा उचलून टाकण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना केल्या.

तसेच रस्त्याच्या खोदकामामुळे संपूर्ण परिसरातील  एम.एस सी बी चा विद्युत पुरवठा सतत बंद पडत असल्यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत  त्यामुळे नागरिकांच्या खूप तक्रारी वाढल्या आहेत. त्याची दखल घेऊन  नाना काटे यांनी या पाहणीवेळी महावितरण व स्मार्ट सिटीच्या विद्युत विभागाच्या अधिकार्यांना देखील हा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी सूचना केल्या, या पाहणीवेळी, स्मार्ट सिटीचे उपअभियंता लक्ष्मीकांत कोल्हे, शिर्के कंपनीचे प्रोजेक्ट व्यवस्थापक तानाजी चव्हाण, विजय बांदल, स्थापत्य उपअभियंता सुनीलदत्त नरोटे, कनिष्ठ अभियंता स्वप्नील शिर्के, सहा.इंजिनियर धनराज स्वामी, अनिकेत धायगुडे व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *