पुणे-नाशिक महामर्गावर आळेफाटा येथे तरुणाचा अपघाती मृत्यु

रामदास सांगळे
विभागीय संपादक 
१२ फेब्रुवारी २०२२

जुन्नर


पुणे-नाशिक महामर्गावर आळेफाटा येथे तरुणाचा अपघाती मृत्यु

बेल्हे – चालकाचे कारवरील नियत्रण सुटल्याने सिमेंटच्या डिव्हायडर आदळून झालेल्या अपघातामध्ये २४ वर्षीय तरुणाचा मृत्यु झाला. ही घटना पुणे-नाशिक महामार्गावर

Accidental death of a youth at Alephata on Pune-Nashik highway
पुणे-नाशिक महामर्गावर आळेफाटा येथे तरुणाचा अपघाती मृत्यु

आळेफाटा जवळील हॉटेल निसर्ग समोर (शुक्रवार दि. ११) सायंकाळी ७ च्या सुमारास घडली. पांडुरंग वसंत सरोदे ( वय-२४ रा. सिरसगाव, ता. परतूर जि. जालना असे अपघात मृत्यु झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत समजलेली अधिकची माहिती अशी की, शुक्रवार सायंकाळी पांडुरंग सरोदे वेगणार गाडी नंबर एम.एच १२ क़्यु.डब्लू ४३३५ स्वता भरधाव वेगाने चालवत पुण्याच्या दिशेने जात होते. पुणे-नाशिक महामार्गाने आळेफाटा नजीक महामार्ग चौपदरीकर संपून सिंगल रस्ता लागल्याचा अंदाज न आल्याने त्याचे वाहन वळणावरील सिमेटच्या डिव्हायडर जाऊन जोरदार आदळले. यामुळे कारचालक सरोदे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने आळेफाटा येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र रुगणालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यु झाल्याचे पोलिसांनी सांगितले. यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले असून आळेफाटा पोलिसांनी मयत पांडुरंग वसंत सरोदे याच्या विरुद्ध बेजवाबदार पणे कार चालवत स्वताच्या जीवाच्या मृत्युला कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *