सर्वसामान्यांच्या हिताची कामे केली त्यावर राजकारण करणाऱ्यांच्या बुद्धीची कीव येते – अजित गव्हाणे

रोहित खर्गे
विभागीय संपादक
७ डिसेंबर २०२१

भोसरी


नुकताच शिरूरचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या हस्ते नगरसेवक अजित गव्हाणे यांच्या पुढाकारातून भोसरीतील १७०० नागरिकांना केंद्र सरकारची योजना असलेल्या आयुष्यमान भारत कार्डचे वितरण करण्यात आले.कोणत्याही सरकारी योजना जनतेच्या कररूपी पैशांतून राबविल्या जातात. व अशा योजनांचा लाभ तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम तेथील स्थानिक नगरसेवकांचे असते. अशा लोकहितासाठी केलेल्या कामाबद्दलही कोण्ही खालच्या थराला जाऊन समाजमाध्यमांवर उलट- सुलट लिहिले जात असेल, तर मोठं दुर्दव्य आहे. प्रत्येक गोष्टीत राजकारण करणाऱ्यांच्या बुद्धीची कीव येते, असा टोला अजित गव्हाणे यांनी आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड देण्यावरून टीका करणाऱ्यांना लगावला.

खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी नगरसेवक अजित गव्हाणे यांच्या कामाचे कौतुक करत म्हणाले कोण रस्त्याची कामे करतो तर कोण सभा मंडपाची कामे करतो पण अशी शाश्वत कामे नेहमी स्मरणात राहतात. यावेळी व्यासपीठावर नगरसेवक विक्रांत लांडे, संजय वाबळे, शाम लांडे, पंकज भालेकर, नगरसेविका अनुराधा गोफणे, भोसरी विधानसभा युवक अध्यक्ष अमित लांडगे, संजय उदावंत, विजय लोखंडे, भारत आबा लांडगे, प्रकाश सोमवंशी , सचिन औटी, चंद्रकांत वाळके, अमर फुगे, यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी ९३७ आरोग्य सुविधा आणि १८६२ पेक्षा अधिक वैद्यकीय प्रक्रियांचे विमा कवच असलेले ओळखपत्र देण्यात आले. या कार्डच्या माध्यमातून नागरिकांना ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार मिळणार आहेत. व असे लोकोपयोगी योजना राबविल्या तर त्यात गैर काय आहे असा सवाल करत गव्हाणे म्हणाले जो लोकहितासाठी कामे करतो त्याला नाउमेद करू नका. कोण कसे वागतो याचे स्वतः आत्मपरिक्षण करा.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *